शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

'त्या' देशाच्या मदतीनं अमेरिकेनं काढला सुलेमानींचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 08:59 IST

इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत.

वॉशिंग्टन: इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. जनरल कासीम सुलेमानींची हत्या करण्याच्या ऑपरेशनमध्ये इस्रायलनं अमेरिकेला गुप्त माहिती पुरवली होती, अशी बाब मीडिया रिपोर्ट्समधून उघड झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या या ऑपरेशनबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूंनाही पूर्वकल्पना होती. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, नेत्यान्याहूंनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. या खुलाशानंतर इस्रायल आणि इराणमधले संबंधही बिघडले आहेत. अमेरिकेला इस्लामी रेव्हॉल्युशनरी गार्डचे जनरल सुलेमानींची सीरियाच्या विमानतळावरील उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर इस्रायलनं याची खातरजमा केली आणि अमेरिकेला याची सूचना दिली होती.  इराकच्या दमिश्कमधून बगदादपर्यंत उड्डाण करण्याची माहिती दिली होती. 3 जानेवारीला सुलेमानींविरोधात ऑपरेशनसाठी माहिती मिळाल्यानंतर या घटनेला परिणाम दिला आहे. अमेरिकेच्या यंत्रणांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुलेमानींच्या हालचालींवर नजर ठेवली होती. या सर्व माहितीची खातरजमा झाल्यानंतर अमेरिकेनं सुलेमानीवर हल्ला करण्याची योजना आखली.  विमानतळावर होते हेररॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सुलेमानीसंदर्भात माहिती देण्यासाठी विमानतळावर काही कर्मचारीसुद्धा हेरगिरी करत होते. यातील एक दमिश्क विमानतळावर काम करत होता. तसेच इतर तीन ते चार हेरांनी अमेरिकेला सुलेमानींच्या ठावठिकाण्याबाबत इत्यंभूत माहिती दिली होती. बगदाद एअरपोर्टवर दोन सुरक्षा अधिकारी आणि चाम एअरलाइन्सवर दोन कर्मचाऱ्यांनी कासीम सुलेमानींच्या संदर्भात अमेरिकेला माहिती दिली होती. चाम एअरलाइन्सच्या विमानातूनच कासीम सुलेमानी बगदादमध्ये पोहोचले होते. इस्रायलनं सुरक्षेचं जाळं केलं मजबूतअमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनंसुद्धा सुरक्षा कवच आणखी मजबूत केलं आहे. इस्रायलनं अत्याधुनिक आयरन डॉम वायुरक्षक तंत्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यामुळे इस्रायलच्या एअर डिफेन्स यंत्रणेत बळकटी आली आहे.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायल