शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:02 IST

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात हूती संघटनेची एन्ट्री झाली आहे.

Israel Hamas War: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास, यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात हमास व्यतिरिक्त लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहदेखील इस्रायली सैन्यावर हल्ले करत आहे. आता या युद्धात आणखी एका संघटनेची एन्ट्री झाली आहे. येमेनची अतिरेकी संघटना हूतीने अधिकृतपणे इस्रायलविरुद्ध पॅलेस्टाईनच्या बाजूने युद्धाची घोषणा केली आहे. 

लवकरच गाझामध्ये युद्धविराम न झाल्यास इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी हूती बंडखोरांनी दिली आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये हूतीने येमेनच्या राजधानीसह देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला. दरम्यान, सोमवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी केल्याचा आरोप केला.

हूती बंडखोर कोण आहेत?1980 च्या दशकात येमेनमध्ये हुतींचा उदय झाला. शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. अब्दुल्ला सालेहच्या आर्थिक धोरणांमुळे हूतींना राग आला, ज्यामुळे येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात अराजगता वाढली आणि सन 2000 मध्ये हूतींनी सैन्य तयार केले. अब्दुल्ला सालेहच्या सैन्याने 2004 ते 2010 दरम्यान हूतींसोबत 6 युद्धे लढली. 2011 मध्ये अरबांच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि सुमारे दोन वर्षे चर्चा सुरू राहिली. पण तोडगा निघाला नाही.

यानंतर, हूतींनी सौदी अरेबिया समर्थित नेते अहमद रब्बो मन्सूर हादी यांना सत्तेवरून हटवले आणि येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली. हूतीकडे असलेले सैनिक टँक, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि अगदी तांत्रिक वाहने चालविण्यास सक्षम आहेत. गेल्या गुरुवारी हूतीने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले, मात्र इस्रायलने हा हल्ला परतून लावला. आता हूतीने युद्धाची घोषणा केली आहे, त्यामुळे युद्ध आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्ध