शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबले; लाखो मुलांसाठी देवदूत बनला हा 10 महिन्यांचा चिमुकला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:11 IST

Israel-Hamas War : गाझामध्ये 11 महिन्यांनंतर युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे.

Israel-Hamas War : गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जे काम जगातील अनेक बलाढ्य देश करू शकले नाहीत, ते काम गाझामध्ये राहणाऱ्या एका 10 महिन्यांच्या मुलाने केले आहे. 11 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध 3 दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हमास आणि इस्रायलने वेगवेगळ्या झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसह अनेक महासत्ता प्रयत्न करत होते, पण एका 10 महिन्यांच्या बाळाने हा चमत्कार केला आहे. युद्ध थांबवण्याचे कारण म्हणजे, डब्ल्यूएचओला गाझामध्ये 25 वर्षांनंतर पोलिओचा विषाणू आढळला आहे. 10 महिन्यांच्या अब्दुल रहमान टाइप 2 पोलिओ विषाणूची लागण झाल्याने अपंग झाला आहे. ही माहिती समजताच डब्ल्यूएचओने गाझामध्ये पोलिओची लस देण्याची मोहिम हाती घेतली आहे. या भागातील 6.4 लाख मुलांना तत्काळ पोलिओ लसीकरणाची आवश्यकता असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणने आहे. 

3 झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धबंदीडब्ल्यूएचओचे अधिकारी रिक पेपरकॉर्न यांनी सांगितले की, युद्धामुळे या भागात पोलिओ लसीकरणाची मोहिम राबवणे अवघड झाल्यामुळे त्यांनी युद्धविरामची विनंती केली होती. त्यामुळेच आता इस्रायली लष्कर आणि हमासमध्ये 3 वेगवेगळ्या झोनमध्ये 3 दिवसांसाठी युद्धविरामावर सहमती झाली आहे. या 3 दिवसांच्या युद्धविराम काळात 6 लाख 40 हजार मुलांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणारी लसीकरण मोहिम सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. लसीकरण मोहीम मध्य गाझा येथून सुरू होईल, त्यानंतर दक्षिण गाझा आणि नंतर उत्तर गाझा येथे राबविण्यात येईल. आवश्यक असल्यास चौथ्या दिवशीही प्रत्येक झोनसाठी युद्धविराम करण्याबाबत इस्रायल आणि हमास यांच्यात करार झाला आहे.

11 महिन्यांपासून युद्ध सुरू 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला, या हल्ल्यात 1,200 लोक मारले गेले आणि 250 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचा हमासचा दावा आहे. यानंतर इस्रायलने हमासवर मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 40 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर दुप्पट लोक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीत इस्रायली सैन्याच्या सुरू असलेल्या कारवाईमुळे गाझामधील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या (23 लाख लोक) विस्थापित झाली आहे.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलwarयुद्धWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना