शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हमासने बंदी बनवलेले अर्ध्याहून जास्त नागरिक परदेशी; इस्रायलचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:08 IST

Israel-Hamas War: इस्रायल हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध गेले २० दिवसांपासून सुरूच

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्ध काही केल्या शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्ध सुरू होऊन आता २० दिवस झाले, तरीही युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहेत. तशताच इस्रायलच्या हवाई दलाचे गाझा पट्टीवर भयंकर हल्ले सुरूच आहेत. या हवाई हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा रिकामा करण्याचा इशारा दिल्यानंतर इस्रायली लष्कराने गाझावरील हवाई हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायली सरकारने बुधवारी सांगितले की, पॅलेस्टिनी गट हमासने पकडलेल्या अंदाजे 220 ओलिस नागरिकांपैकी अर्ध्याहून अधिक लोक हे परदेशी आहेत.

४० देशांतील ३२८ लोक मृत, बेपत्ता; अनेकांकडे परदेशी पासपोर्ट

इस्रायलने असा दावा केला आहे की, हमासने ओलिस ठेवलेल्यांपैकी ५४ थाई नागरिकांसह २५ वेगवेगळ्या देशांचे परदेशी पासपोर्ट आहेत. तसेच, रॉयटर्सच्या वृत्तात अद्ययावत आकडेवारीनुसार, दक्षिण इस्रायलवर हमासच्या सैनिकांनी ७ ऑक्टोबरला केलेल्या अचानक हल्ल्यानंतर ४० देशांतील ३२८ लोक मृत आणि बेपत्ता झाल्याची पुष्टी झाल्याचेही सरकारने म्हटले आहे. या हल्ल्यात एकूण १४०० लोक मारले गेले आहेत.

‘१३८ ओलिसांकडे परदेशी पासपोर्ट’

इस्रायलने सांगितले की, १३८ ओलिसांकडे विदेशी पासपोर्ट होते, ज्यात १५ अर्जेंटिनाचे, १२ जर्मनीचे, १२ अमेरिकन, सहा फ्रेंच आणि सहा रशियन नागरिक आहेत. याशिवाय अनेकांना दुहेरी इस्रायली नागरिकत्व असल्याचे मानले जात आहे. त्यात काही थाई आणि पाच नेपाळी ओलिस आहेत असा अंदाज आहे. तसेच एक चिनी, एक श्रीलंकन, दोन टांझानियन आणि दोन फिलिपिनो यांनाही ओलीस ठेवण्यात आले होते.

थायलंडच्या नागरिकांचा परदेशी मृत आणि बेपत्ता लोकांचा सर्वात मोठा सिंगल ग्रुप तयार केला आहे, ज्यामध्ये २४ मृत आहेत आणि २१ बेपत्ता असल्याची पुष्टी झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, थायलंड हा इस्रायलमध्ये स्थलांतरित कामगारांचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. त्यांचे सुमारे 30,000 लोक कृषी क्षेत्रात काम करतात.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलpassportपासपोर्टTerrorismदहशतवादArgentinaअर्जेंटिनाUSअमेरिका