शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हमास प्रमुखांच्या ठिकणांवर इस्रायली सैन्याची कारवाई; 35 बोगदे आढळले, दारुगोळा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 18:37 IST

इस्रायलचे सैन्य सातत्याने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहे.

Israel-Hamas War: गेल्या एका महिन्यापासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायली सैन्य सातत्याने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकणांना उद्ध्वस्त करत आहे. रविवारी इस्रायली सैन्याने हमास प्रमुखांच्या निवासस्थानांवर कारवाई केली. सैन्य निवासस्थानात गेले अन् आतील दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. 

इस्रायली सैन्याला हमासच्या प्रमुखांच्या निवासस्थानी सुमारे 35 बोगदे सापडले. यासोबतच मोठ्या प्रमाणात दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. गाझा पट्टीच्या शेख एजलीन आणि रिमल भागात ही कारवाई करण्यात आली. इस्रायली सैन्याला इथे बोगदे आढळले, 7 रॉकेट लॉन्चर, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. या कारवाईदरम्यान इस्रायली सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल हमासच्या अनेक दहशतवाद्यांनाही ठार केले.

इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई आणि जमीन अशा दोन्ही बाजूंनी हल्ले होत आहेत. दुसरीकडे, हमासचे सैनिकही प्रत्युत्तर देत आहेत. रविवारी हमासने इस्रायली लष्कराचे रणगाडे उडवले. तिकडे रुग्ण, कर्मचारी आणि इतरांनी गाझा पट्टीतील सर्वात मोठ्या शिफा हॉस्पिटलचा परिसर रिकामा केला. रुग्णालय आता पूर्णपणे इस्रायली सुरक्षा दलांच्या ताब्यात आहे.

रुग्णालय हमासचा तळ होताशिफा रुग्णालयाबाबत इस्रायल सुरुवातीपासूनच दावा करत आहे की, हमासचे सैनिक आरोग्य सुविधांच्या आडून आपली छावणी उभारत आहेत. शिफा हॉस्पिटलकडून अनेक व्हिडिओही जारी करण्यात आले होते, ज्यात हमासचे सैनिक शस्त्रास्त्रांसह दिसत होते. इस्रायलने दावा केला होता की हॉस्पिटलच्या आत एक बोगदा आहे जो हमास युद्धासाठी वापरत असलेल्या बोगद्याला जोडतो.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्ध