शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू; IDF नं सांगितलं, इस्लामिक जिहादचं रॉकेट मिसफायर झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 09:31 IST

इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही.

इस्रारायल-हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे किमान  4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यातच, इस्रायलने गाझातील एका रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा हमासने मंगळवारी रात्री उशिरा केला. या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या या दाव्यानंतर, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही उत्तर दिले आहे.

इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही. ज्या लोकांनी आमच्या मुलांच्या निर्घृन हत्या केल्या, ते त्यांच्या मुलांच्याही हत्या करत आहेत. 

रुग्णांलयावरील हल्ल्यासंदर्भात IDF -  तत्पूर्वी, यासंदर्भात माहिती देताना आयडीएफने म्हटले आहे, रुग्णालयावरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. शत्रूकडून इस्रायलवर अनेक रॉकेट लॉन्च करण्यात आले होते. यांपैकी एका अयशस्वी छरलेल्या रॉकेटने गाझातील या रुग्णालयाला निशाणा बनवले. आमच्याकडे असलेल्या गुप्त माहितीनुसार, रुग्णालयावर झालेल्या या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद जहशतवादी संघटना जबाबदार आहे.

हा हवाई हल्ला मध्य गाझातील अल अहली रुग्णालयावर झाला. हे गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असल्याचे सांगण्यात जाते. इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री अल अहली अरबी बापटिस्ट रुग्णालयावर एअरस्ट्राइक केल्याचा दावा गाझा आरोग्य मंत्रालयाने केला होता. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर जखमी आणि इतर पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी आसरा घेतला होता.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूhospitalहॉस्पिटलTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद