इस्त्रायल आणि येमेनच्या हुथी बंडखोरांमध्ये आणखी वाद चिघळला आहे. बंडखोरांनी लाल समुद्रात मॅजिक सीज नावाच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवले. हे जहाज लायबेरियाचा ध्वज असलेले आणि ग्रीक मालकीचे बल्क कॅरियर होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी ६ जुलै २०२५ रोजी हा हल्ला केला. हुथींनी या जहाजावर हल्ला करण्यासाठी ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि लहान शस्त्रांचा वापर केला. हुथी बंडखोरांनी या जहाजावरील हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये समुद्री जहाजात एक भयानक स्फोट होताना दिसत आहे.
मुस्लिम बहुसंख्य असलेल्या 'या' देशात आहेत जवळपास १० हजार हिंदू मंदिरं! तुम्हाला माहितीये का?
स्फोटानंतर काही सेकंदातच जहाजाला आग लागली. काही सेकंदातच जहाजात मोठा स्फोट झाला आणि मॅजिक सीज नावाचे जहाजाचे दोन तुकडे झाले. हे जहाच काही वेळातच सुद्रात बुडाले. या हल्ल्याची जबाबदारी हुथींनी घेतली. इस्त्रायलने नाकाबंदीचे उल्लंघन केल्याचा दावा यावेळी हुथींनी केला.
हुथींच्या हल्ल्यामुळे जहाजातील २२ क्रू मेंबर्सना जहाज सोडून पळून जावे लागले. जहाजातील कर्मचाऱ्यांना वाटवण्यात आले आहे.
युरोपियन युनियन नौदल मिशन ऑपरेशन अॅस्पाइड्सने मंगळवारी लाल समुद्रात लायबेरियाच्या ध्वजांकित, ग्रीक मालकीच्या मालवाहू जहाजावर हुथींनी केलेल्या हल्ल्यात तीन खलाशांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
क्रू मेंबर जखमी
जखमी क्रू मेंबरपैकी एकाचा पाय गेला आहे. सोमवारी रात्री सुएझ कालव्याकडे उत्तरेकडे जाणारा हा बल्क कॅरियर लहान बोटी आणि बॉम्बने भरलेल्या ड्रोनने सतत गोळीबार केला. जहाजावर असलेल्या सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला पण जीवितहानी रोखण्यात ते अयशस्वी झाले.
हुथी बंडखोर गेल्या काही दिवसांपासून लाल सागरामध्ये व्यापारी जहाजांना लक्ष करत आहेत. हे हल्ले इस्त्रायल आणि हमासच्या संघर्षाचे समर्थन म्हणून असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे समुद्रातील संरक्षणावरुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लाल सागर हा व्यापारासाठी महत्वाचा मानला जातो.
या हल्ल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेचा निषेध केला आहे . हुथींच्या या कृतीमुळे मध्य पूर्वेतील आधीच सुरू असलेल्या गोंधळात आणखी भर पडली आहे.