शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:03 IST

इराणच्या राष्ट्रपतींचा इस्रायलला इशारा...!

मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. एकीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला आहे, तर दुसरीकडे इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ले सुरू केल्याचे वृत्त आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली सैनिकांनी पुन्हा एकदा इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहेत.

इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलची पुन्हा बॉम्बिंग - माध्यमांतील वृत्तांनुसार, इस्रायलने शिराज आणि तबरीज शहरांबरोबरच नतांज अण्वस्त्र ठिकाणांवर पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. तत्पूर्वी, "इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या मुख्य अण्वस्त्र ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे. ही मोहीम आणखी लांबू शकते," असे इस्रायली सैन्य प्रवक्ता ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी सांगितले. याचा अर्थ, इस्रायल इराणवर आणखी हल्ले करणार हे स्पष्ट आहे.

इराणच्या राष्ट्रपतींचा इस्रायलला इशारा -इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमचे आणि अण्वस्त्र ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे. याच बरोबर, या हल्ल्यात इराणचे लष्कर प्रमुख मोहम्मद बाघेरी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोरचे कमांडर हुसैन सलामी मारले गेले आहेत. असेही इराणने म्हटले आहे. याशिवाय, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी देशाला संबोधित करताना, "इराणची प्रतिक्रिया एवढी भयंकर असेल की, इस्रायल पश्चाताप करेल. 

ट्रम्प यांचा इशारा -ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, "मी इराणला अणु करार करण्यासाठी अनेक संधी दिल्या आहेत. त्यांना कडक शब्दात करार करण्यास सांगितले, पण त्यांनी अद्याप मान्य केले नाही. काही इराणी कट्टरपंथी या कराराला विरोध करत होते, पण ते सर्व आता मारले गेले आहेत. इस्रायलकडे अनेक घातक शस्त्रे आहेत, पुढे जे घडेल, ते आणखी वाईट असेल. आधीच खूप मृत्यू आणि विनाश झाला आहे, पण हा नरसंहार संपवण्यासाठी अजूनही वेळ आहे."  

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प