जगभरात प्रसिद्ध असलेली पर्यावरण सामाजिक कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग गाझाकडे मदत घेऊन जात असताना इस्रायलच्या लष्कराने कारवाई केली. समुद्रातून अनेक जहाजातून जात असताना लष्कराने ती समुद्रात रोखली आणि त्यानंतर ग्रेटा थनबर्ग, पाकिस्तानचे माजी खासदार आणि इतर लोकांना घेऊन इस्रायलच्या बंदरात नेण्यात आले.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात जहाजे रोखल्याचे दिसत आहे. एका जहाजावर स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गही दिसत आहे. तिच्या चारही बाजूला सैनिक उभे आहेत.
इस्रायलने हमासशी संबंधित असलेल्या पाकिस्तानच्या माजी खासदारालाही यावेळी ताब्यात घेतले. इस्रायलच्या लष्कराने अनेक जहाजातून प्रवास करत असलेल्या ३७ देशातील २०० पेक्षा अधिक लोकांना पकडले.
इस्रायलने कारवाईनंतर काय सांगितले?
या कारवाईबद्दल इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हमास-सुमूद फ्लोटिलाच्या अनेक जहाजे सुरक्षितपणे रोखण्यात आली आहेत. त्यातील सर्वांना इस्रायलच्या बंदरात नेण्यात आले आहे. ग्रेटा थनबर्ग आणि त्यांचे सहकारी सुरक्षित आहेत.
ग्लोबल सुमूद फ्लोटिला नावाने एक मोहीम सुरू आहे, ज्या माध्यमातून औषधी आणि जेवण गाझामध्ये पोहोचवले जाणार होते. १३ पेक्षा अधिक जहाजे होती, त्यात ५०० पेक्षा जास्त लोक बसलेले होते. त्यात खासदार, वकील आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत.
Web Summary : Israeli forces intercepted a flotilla to Gaza, detaining Greta Thunberg, a former Pakistani MP, and others. Over 200 people from 37 countries were held. The aid convoy aimed to deliver supplies to Gaza.
Web Summary : इस्राइल ने गाजा जा रहे जहाजों को रोका, ग्रेटा थनबर्ग और पूर्व पाकिस्तानी सांसद सहित कई लोग हिरासत में। 37 देशों के 200 से अधिक लोग पकड़े गए। सहायता काफिले का उद्देश्य गाजा को आपूर्ति करना था।