शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:00 IST

Israel America Iran War: इराणच्या समृद्ध युरेनियमचा साठा असलेल्या सेंट्रीफ्युजना धक्काही लागला नसल्याचा पेंटागॉनचाच रिपोर्ट व्हायरल झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सारवासारव करत तो खोटा रिपोर्ट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करूनही इराण आणि इस्रायलचे हल्ले काही काळ सुरुच होते. यानंतर मंगळवारी दुपारी दोन्ही देश युद्धविराम करण्यासाठी तयार असल्याची घोषणा करण्यात आली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू, आता पुढचे टेन्शन सुरु झाले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तेथील तब्बल ४०० किलो शुद्धीकरण केलेले युरेनियम गायब झाले आहे. 

इराणच्या समृद्ध युरेनियमचा साठा असलेल्या सेंट्रीफ्युजना धक्काही लागला नसल्याचा पेंटागॉनचाच रिपोर्ट व्हायरल झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सारवासारव करत तो खोटा रिपोर्ट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू, आता उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनीच एबीसी न्यूजला  400 किलोग्राम युरेनियम गायब झाल्याचे कबुल केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा साठा एवढा प्रचंड आहे की त्याद्वारे १० अणुबॉम्ब तयार करता येऊ शकतात. 

हे युरेनियम सध्यातरी शु्द्धीकरणाच्या प्रक्रियेत आहे. ६० टक्के समृद्ध असून अणुब़ॉम्ब तयार करण्यासाठी ते ९० टक्के समृद्ध व्हावे लागते. हे दिलासा देणारे जरी असले तरी ६० ते ९० टक्क्यांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ तीन ते चार आठवडे लागतात. यामुळे हे गायब झालेले युरेनियम दुष्ट शक्तींच्या हाती लागले तर जगावर मोठे संकट येऊ शकते. इराण पुढील महिन्याभरात हे युरेनियम ९० टक्के समृद्ध करणारा होता, असा दावा करतच इस्रायल आणि अमेरिकेने हा हल्ला केला होता. इराणनेच हे युरेनियम हल्ला झालेल्या ठिकाणावरून हटविल्याचे सांगितले जात आहे. 

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर गायब झालेल्या ९०० पौंड (सुमारे ४०० किलो) अत्यंत समृद्ध युरेनियमबाबत अमेरिका येत्या आठवड्यात इराणशी चर्चा करेल, असे वेन्स म्हणाले आहेत. तसेच फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील इराणी अणुऊर्जा केंद्रांना गंभीर नुकसान झाले आहे किंवा ते पूर्णपणे नष्ट झाले आहेत, परंतू आपण अचूक माहिती देऊ शकत नाही, असे वेन्स म्हणाले. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराण