इस्रायली गुप्तहेराची इसिसने केली हत्या?
By Admin | Updated: March 11, 2015 11:24 IST2015-03-11T09:26:11+5:302015-03-11T11:24:43+5:30
इसिस या दहशतवादी संघटनेने इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवत एका तरूणाची हत्या केली आहे आणि त्यासाठी त्यांनी एका लहान मुलाचा वापर केला आहे.

इस्रायली गुप्तहेराची इसिसने केली हत्या?
ऑनलाइन लोकमत
बैरुत, दि. ११ - आत्तापर्यंत पत्रकार, सैनिकांची हत्या करणा-या इसिस या दहशतवादी संघटनेने इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवत एका तरूणाची हत्या केली आहे आणि त्यासाठी त्यांनी एका लहान मुलाचा वापर केला आहे. इसिसतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक व्हिडीओमध्ये एक अल्पवयीन मुलगा नागरिकाच्या डोक्यात गोळ्या घालून त्याला ठार करत असल्याचे दिसत आहे.
मोहम्मद सईद इस्माइल मुसल्लम असे त्या ठार केलेल्या बंधकाचे नाव असून तो इस्रायलचा गुप्तहेर असल्याचा आरोप इसिसने केला आहे. सुमारे १३ मिनिटे कालावधीच्या या व्हिडीओत ठार करण्यात आलेल्या तरूणाने नारिंगी रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. त्याच्यामागेच अल्पवयीन मुलगा उभा असून त्याने त्या बंधकाच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केल्याचे दिसते.
मुसल्लमच्या कुटुंबियांनी मात्र तो गुप्तहेर नसल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओच्या अधिकृततेची खात्री अद्याप पटली नसल्याचे इस्रायली सुरक्षा अधिका-यांनी म्हटले आहे.