इस्लामिक स्टेटचे दहशतवादी टेलीग्राम अॅपवर विकतात याझिदी मुली
By Admin | Updated: July 6, 2016 13:13 IST2016-07-06T13:13:08+5:302016-07-06T13:13:08+5:30
अवघ्या 12 वर्षांची कुमारी व सुंदर मुलगी 12,500 डॉलर्समध्ये विकण्यास उपलब्ध आहे, तिची लवकरच विक्री होईल अशा प्रकारच्या जाहिराती इस्लामिक स्टेटचे दहशतवादी

इस्लामिक स्टेटचे दहशतवादी टेलीग्राम अॅपवर विकतात याझिदी मुली
>ऑनलाइन लोकमत
बगदाद (इराक), दि. 6 - अवघ्या 12 वर्षांची कुमारी व सुंदर मुलगी 12,500 डॉलर्समध्ये विकण्यास उपलब्ध आहे, तिची लवकरच विक्री होईल अशा प्रकारच्या जाहिराती इस्लामिक स्टेटचे दहशतवादी टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून करत आहेत. अरेबिकमध्ये लिहिलेल्या जाहिराती इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या याझिदी समाजातील महिला व लहान मुलांची विक्री करण्यासाठी प्रसृत करण्यात येत आहेत. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इराक व सीरियामधला मोठा भूभाग ताब्यात घेतला त्यावेळी उत्तर इराकमधल्या हजारो याझिदींना गुलाम केले आणि महिलांना सेक्स स्लाव बनवले.
असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिले असून त्यांना सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून मोठा भूभाग निसटत असला तरी त्यांच्या कचाट्यात जवळपास 3000 याझिदी महिला व मुले असल्याचा अंदाज आहे. मध्युगातली सेक्स स्लावची रानटी प्रथा अत्याधुनिक अॅपच्या सहाय्याने इसिस जोपासत असल्याचे हे भीषण चित्र आहे. या महिलांचे फोटो, त्यांच्या मालकाचे नाव अशा सगळ्या बाबींसह या जाहिराती इसिसच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात करण्यात येत आहेत.
आधी, स्वयंसेवी संस्था कुर्दीश सैन्य या याझिदींना सोडवण्याचा प्रयत्न करत असे. मात्र, आता सगळ्या याझिदी महिलांची व लहान मुलांची नावे, फोटो व मालकाची माहिती रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली असल्याने सेक्युरिटी चेक पॉइंटवरून त्यांना बाहेर काढणे बिकट झाले आहे. आदी दर महिन्याला शंभर पेक्षा जास्त महिलांची सुटका केली जायची, आता हे प्रमाण सहा महिन्यात अवघे 39 एवढे कमी झाले आहे.