शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनला आयसिसचं खुलं आव्हान! चिनी रेस्टॉरंट उडवलं; 'या' कारणामुळे चीन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:19 IST

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका चिनी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका चिनी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जग हादरले आहे. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'ने स्वीकारली असून, त्यांनी प्रथमच चीनला थेट लक्ष्य केले आहे. चीनमधील उइघुर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा खळबळजनक दावा आयसिसने केला आहे.

नेमकं काय घडलं?

काबूलमधील 'शहर-ए-नाव' या गजबजलेल्या भागात असलेल्या एका चिनी रेस्टॉरंटच्या किचनमध्ये हा भीषण स्फोट झाला. या हल्ल्यात एका चिनी नागरिकासह किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आयसिसच्या दाव्यानुसार मृतांचा आणि जखमींचा आकडा २५च्या वर आहे. एका इटालियन चॅरिटी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २० मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. या रेस्टॉरंटचे मालक अफगाणी नागरिक असले तरी, त्यात एक चिनी नागरिक आणि त्याची पत्नी भागीदार होते.

हल्ल्याचे कारण काय?

आयसिसने आपली वृत्तसंस्था 'अमाक'च्या माध्यमातून या हल्ल्याचे कारण स्पष्ट केले आहे. "चीनमध्ये उइघुर मुस्लिमांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. या अत्याचारांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही चिनी नागरिकांना लक्ष्य केले आहे," असे संघटनेने म्हटले आहे. या हल्ल्यात तालिबानचे काही कमांडरही मारले गेल्याचा दावा आयसिसने केला आहे, मात्र तालिबानने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

चीनची धाकधूक वाढली

२०२१ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर बहुतेक देशांनी अफगाणिस्तान सोडला, पण चीनने आपले आर्थिक प्रकल्प तिथे सुरूच ठेवले आहेत. आता आयसिसने उइघुर मुस्लिमांच्या नावाखाली चीनला दिलेली ही धमकी बीजिंगसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. पाकिस्तानातही चिनी इंजिनिअर्सवर सतत हल्ले होत असताना, आता अफगाणिस्तानातही चिनी नागरिक सुरक्षित नसल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे.

तालिबानची कोंडी

तालिबानचे प्रवक्ते मुफ्ती अब्दुल मतीन कानी यांनी सांगितले की, या स्फोटाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, तालिबानने अद्याप याला दहशतवादी हल्ला म्हणणे टाळले आहे. मात्र, आयसिसच्या या खुल्या आव्हानामुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षेवर आणि तालिबानच्या प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ISIS claims Kabul restaurant attack, targeting China over Uyghur issue.

Web Summary : ISIS claimed responsibility for the Kabul restaurant attack, citing China's Uyghur oppression. The blast killed several, including a Chinese citizen, raising security concerns for Chinese interests in Afghanistan and challenging Taliban's control.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानchinaचीनTerrorismदहशतवाद