भारतावर हल्ल्यासाठी इसिसचा नवा प्लॅन
By Admin | Updated: April 11, 2016 18:17 IST2016-04-11T18:07:25+5:302016-04-11T18:17:34+5:30
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं भारतावर हल्ला करण्यासाठी कॅनडातल्या शीख दहशतवाद्यांसोबत हातमिळवणी केली आहे.

भारतावर हल्ल्यासाठी इसिसचा नवा प्लॅन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११- इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं भारतावर हल्ला करण्यासाठी कॅनडातल्या शीख दहशतवाद्यांसोबत हातमिळवणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इसिस आणि कॅनडातले हे शीख दहशतवादी लवकरच भारतावर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
कॅनडातले हे शीख दहशतवादी लपून भारतावर हल्ल्याची तयारी करत आहेत. एका महिला शीख दहशतवाद्याच्या फोन रेकॉर्डिंगवरून भारतातल्या गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे. या फोन संभाषणावरून दिल्ली हे हल्ल्याचं मुख्य केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येते आहे. या रिपोर्टनुसार इसिस भारतावर हल्ल्यासाठी पाकिस्तानमधल्या स्लीपर सेल आणि बनावट पैशांची मदत घेणार आहे. इसिसचे दहशतवादी मालदीव आणि बांगलादेशमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे भारताला या हल्ल्याची भीती आहे.