इसिसचा मृत्यूचा वरवंटा , १४६ ठार
By Admin | Updated: June 26, 2015 23:50 IST2015-06-26T23:50:23+5:302015-06-26T23:50:23+5:30
सिरियातील कोबाने शहर ताब्यात घेतल्यानंतर इसिस संघटनेच्या क्रौर्याने परिसीमा गाठली असून, २४ तासात झालेल्या हिंसाचारात १४६ नागरिकांना ठार मारले आहे.
_ns.jpg)
इसिसचा मृत्यूचा वरवंटा , १४६ ठार
कोबाने : सिरियातील कोबाने शहर ताब्यात घेतल्यानंतर इसिस संघटनेच्या क्रौर्याने परिसीमा गाठली असून, २४ तासात झालेल्या हिंसाचारात १४६ नागरिकांना ठार मारले आहे. इसिस या इस्लामिक संघटनेकडून सिरियात झालेला हा सर्वाधिक भीषण हिंसाचार असल्याचे सिरियातील निरीक्षक संघटनेने म्हटले आहे.
कोबाने शहरात मृत्यूचा वरवंटा फिरत आहे, कोबाने हे शहर कुर्दिश प्रतिकाराचे प्रतीक बनल्याने इसिसचे क्रौर्य कळसाला पोहोचले आहे. इसिसच्या आत्मघाती बॉम्बरने कोबाने शहराच्या प्रवेशद्वारात स्वत:चे स्फोट घडवून आणले व येणारी वाहने उडविण्यात आली. मागून येणाऱ्या इसिसच्या जिहादींसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. मृत नागरिकांत महिला व लहान मुले आहेत. त्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आहेत. शहरात आलेल्या इसिसच्या जिहादींनी घराघरात शिरून गोळीबार केला. इसिसच्या या हल्ल्याला लष्करात कोणताही शब्द नाही असे स्थानिक पत्रकार मुस्तफा अली यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)