ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार

By Admin | Updated: August 31, 2016 11:34 IST2016-08-31T11:34:46+5:302016-08-31T11:34:46+5:30

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल-अदनानीला ठार करण्यात आलं आहे

ISIS terrorist killed Adnan killed by US | ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार

ISIS दहशतवादी अदनानीला अमेरिकेने केलं ठार

>- ऑनलाइन लोकमत
सिरिया, दि. 31 - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल-अदनानीला ठार करण्यात आलं आहे. सिरियामधील अलेप्पो प्रांतात सैन्यांविरोधात छेडण्यात येणा-या मोहिमेवर लक्ष ठेवण्याचं काम करत असतानाच त्याचा अमेरिकेच्या सैन्यांकडून खात्मा करण्यात आला. अमेरिकेने यासंबंधी अधिकृतपणे माहिती देताना अलेप्पो प्रांतात हवाई हल्ल्यादरम्यान इसीसचा एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली होती. 
 
अमेरिकेने ही माहिती दिल्यानंतर इसीसची अधिकृत वृत्तवाहिनी अमाकने अबू मोहम्मद अल-अदनानी ठार झाला असल्याचं सांगत अमेरिकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. 'आमचा प्रवक्ता अबू मोहम्मद अल-अदनानी शहीद झाला असून त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यात येईल', अशी धमकी इसीसकडून देण्यात आली आहे. 
 
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार पॅरिससहित युरोपमधील देशांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा खरा सुत्रधार अबू मोहम्मद अल-अदनानी होता. त्यानेच हे हल्ले करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती आहे. 
 

Web Title: ISIS terrorist killed Adnan killed by US