अमेरिकेच्या हल्ल्यात इसिसचा नंबर दोनचा नेता ठार

By Admin | Updated: March 25, 2016 21:29 IST2016-03-25T21:15:48+5:302016-03-25T21:29:30+5:30

इसिसचा नंबर दोनचा नेता अब्द अल रहमान मुस्तफा याला अमेरिकेने कंठस्नान घातले आहे. सिरीयामध्ये कारवाई दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात अब्द अल रहमान ठार झाला.

Isis number two leader killed in US attack | अमेरिकेच्या हल्ल्यात इसिसचा नंबर दोनचा नेता ठार

अमेरिकेच्या हल्ल्यात इसिसचा नंबर दोनचा नेता ठार

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २५ - इसिसचा नंबर दोनचा नेता अब्द अल रहमान मुस्तफा याला अमेरिकेने कंठस्नान घातले आहे. सिरीयामध्ये कारवाई दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात अब्द अल रहमान ठार झाला. 
जगभरात धुमाकूळ घालणा-या इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये बगदादी खालोखाल तो नंबर दोनचा नेता होता. इसिसचा अर्थमंत्री  अशी त्याची ओळख होती. अमेरिकेची संरक्षण विषयक संस्था पेंटागॉनने अब्द अल रहमान मुस्तफाला ठार मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
अब्द अल रहमान मुस्तफाचा मृत्यू इसिससाठी एक धक्का असून, यामुळे इसिसच्या इराक आणि सिरियामधील  कारवायांना आळा बसेल तसेच त्यांची क्षमता देखील कमी होईल असे पेंटागॉनचे प्रमुख अॅशटॉन कार्टर यांनी सांगितले. 
 

Web Title: Isis number two leader killed in US attack