इसिसने केली ३० ख्रिश्चनांची हत्या

By Admin | Updated: April 21, 2015 06:09 IST2015-04-21T06:09:45+5:302015-04-21T06:09:45+5:30

इसिस ऊर्फ इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेने लिबियात २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्याला दोन महिने उलटतात न उलटतात तोच लिबियाच्या किनारपट्टीवर आणखी

Isis murdered 30 Christians | इसिसने केली ३० ख्रिश्चनांची हत्या

इसिसने केली ३० ख्रिश्चनांची हत्या

त्रिपोली : इसिस ऊर्फ इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेने लिबियात २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्याला दोन महिने उलटतात न उलटतात तोच लिबियाच्या किनारपट्टीवर आणखी ३० ख्रिश्चन नागरिकांची हत्या करण्यात आली असून शिरच्छेद केल्याची चित्रफीतही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या हत्याकांडाचा अमेरिकेने निषेध केला.
नवी चित्रफीत ३० मिनिटांची आहे. इसिसचे जिहादी इथियोपियन ख्रिश्चन नागरिकांचा शिरच्छेद करत असल्याचे या चित्रफितीत दिसते, तर याच चित्रफितीत आणखी एक हत्याकांड चित्रित करण्यात आले असून, त्यात दुसऱ्या ठिकाणी ख्रिश्चन कैद्यांना उभे करून गोळ्या घातल्याचे दिसत आहे. पूर्व लिबियाच्या बर्का प्रांतात तसेच दक्षिण लिबियातील फज्जान प्रांतात हे हत्याकांड करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: Isis murdered 30 Christians