सेक्स करताना 'इसिस इज गुड, इसिस इज ग्रेट'; ८२ वर्षीय आजीने लावला पोलिसांना फोन
By Admin | Updated: December 24, 2015 17:04 IST2015-12-24T17:01:27+5:302015-12-24T17:04:35+5:30
विस्कॉन्सिनमधील पोलीसांना एक वेगळाच किस्सा अनुभवायला मिळाला. एक तरुणी सेक्स करताना तीच्याकडून 'इसिस इज गुड, इसिस इज ग्रेट' अशाप्रकारचा आवाज येत

सेक्स करताना 'इसिस इज गुड, इसिस इज ग्रेट'; ८२ वर्षीय आजीने लावला पोलिसांना फोन
>
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २४ - विस्कॉन्सिनमधील पोलीसांना एक वेगळाच किस्सा अनुभवायला मिळाला. एक तरुणी सेक्स करताना तीच्याकडून 'इसिस इज गुड, इसिस इज ग्रेट' अशाप्रकारचा आवाज येत असल्याने शेजारी राहणा-या ८२ वर्षीय आजीने थेट पोलीसांना फोन लावल्याची घटना घडली.
येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, विस्कॉन्सिन प्रातांत राहणा-या ८२ वर्षीय आजीने येथील ब्राउन डीअर पोलिस स्टेशनमध्ये फोन केला आणि तिने माझ्या घराशेजारी असणारी तरुणी सेक्स करताना 'इसिस इज गुड, इसिस इज ग्रेट' असं ओरडल्याचे मी ऐकलं असून आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावे असं, सांगितले. यावर पोलीसांनी तिला पुन्हा असा आवाज आला तर फोन करा, असे उत्तर दिल्यानंतर या आजीचा फोन आला नसल्यामुळे पुढे काय घडलेचं नाही.
दरम्यान, या संदर्भात ब्राउन डीअर पोलीस स्टेशनचे अधिकारी मायकल कास यांनी हा किस्सा आपल्या ट्विटरवर टाकला आहे.