इराकमधील महिलांचा सुन्ता करण्याचा ISISचा फतवा
By Admin | Updated: July 25, 2014 14:27 IST2014-07-25T09:34:00+5:302014-07-25T14:27:05+5:30
इराकमधील सर्व महिलांचा सुन्ता करण्यात यावा असा फतवा आयएसआयएस या दहशतवादी गटाने काढला आहे.

इराकमधील महिलांचा सुन्ता करण्याचा ISISचा फतवा
ऑनलाइन टीम
जिनीव्हा दि. २५ - इराकमधील सर्व महिलांचा सुन्ता करण्यात यावा असा फतवा आयएसआयएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी संघटनेने काढला आहे. ११ ते ४६ वयोगटातील सर्व महिलांचा सुन्ता करण्याचा फतवा जाहीर करण्यात आला असून युद्ध प्रभावित राष्ट्रातील सुमारे ४० लाख महिलांवर याचा होणार आहे. इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकारी जॅकलीन बडकॉक यांनी या फतव्याबबात माहिती देत चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या महिन्यात आयएसआयएसने इराक व उत्तर पश्चिमी क्षेत्रातील मोठ्या भागावर कब्जा केला होता. आणि आता ते या भागातील नागरिकांवर आपले कट्टर विचार लादत आहेत. जॅकलीन यांच्या म्हणण्यानुसार, जर संयुक्त राष्ट्राकडून मिळालेली माहिती पाहिली, तर सुमारे ४० लाख मुली व महिलांवर या निर्णयाचा दुष्परिणाम होणार आहे.
विशेष म्हणजे इराकमध्ये महिलांचा सुन्ता करण्याची घटना पहिल्यांदाच घडत आहे.
जॅकलीन यांच्या सांगण्यानुसार, आयएसआयएसच्या ताब्यातील मोसुल येथे आता अवघी २० ख्रिश्चन कुटुंबे उरली आहेत. बरीचशी कुटुंबे कुर्दीश येथे स्थलांतरित झाली असून काहींनी मुस्लीम धर्मही स्वीकारला आहे.