इसिसचा कमांडर ठार

By Admin | Updated: May 18, 2015 02:45 IST2015-05-18T02:45:54+5:302015-05-18T02:45:54+5:30

अमेरिकेच्या खास कारवाई दलाच्या कमांडोंनी पूर्व सिरियात शुक्रवारी उत्तररात्री टाकलेल्या छाप्यात इसिस वा इस्लामिक स्टेटस्चा वरिष्ठ

Isis commander killed | इसिसचा कमांडर ठार

इसिसचा कमांडर ठार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या खास कारवाई दलाच्या कमांडोंनी पूर्व सिरियात शुक्रवारी उत्तररात्री टाकलेल्या छाप्यात इसिस वा इस्लामिक स्टेटस्चा वरिष्ठ कमांडर ठार झाला असून त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेने इसिसच्या ताब्यातील प्रदेशात केलेली ही पहिलीच जमिनीवरील कारवाई आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इसिसला जबर झटका बसला आहे. व्हाईट हाऊसने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार अमेरिकेच्या सील कमांडोंनी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईप्रमाणेच ही मोहीम आखण्यात आली. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आदेशानुसार आखल्या गेलेल्या अबोटाबाद येथील कारवाईत अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन मारला गेला होता. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Isis commander killed