'इसिस' प्रमुख अल बगदादी ठार? रेडिओ इराणचा दावा
By Admin | Updated: April 27, 2015 18:47 IST2015-04-27T18:13:00+5:302015-04-27T18:47:21+5:30
'इसिस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'रेडिओ इराण'ने दिले आहे. ऑल इंडिया रेडिओने 'रेडिओ इराण'च्या हवाल्याने याबद्दल ट्विट केले आहे.

'इसिस' प्रमुख अल बगदादी ठार? रेडिओ इराणचा दावा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - 'इसिस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'रेडिओ इराण'ने दिले आहे. ऑल इंडिया रेडिओने 'रेडिओ इराण'च्या हवाल्याने याबद्दल ट्विट केले आहे. बगदादीचा मृत्यू इसिससाठी जबर धक्का मानला जात आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झालेला बगदादी मरणासन्न अवस्थेत असल्याचा दावा गार्डियन वृत्तपत्राने केला होता. बगदादी जखमी झाल्यानंतर ब-याच काळ 'इसिस'च्या कारवायाही थंडावल्याची चर्चा होती. त्यानंतर आता त्याच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. मात्र या वृत्तास अद्याप अन्य कोणत्याही माध्यमातून दुजोरा मिळालेला नाही.
सुमारे ४० वर्षांचा असलेल्या बगदादीच्या डोक्यावर अमेरिकेने १ कोटी डॉलर्सचे बक्षीस लावले होते. अल काईदाचा नेता अयमान अल जवाहिरी याच्यापेक्षाही बगदादी अधिक शक्तिशाली असल्याचे मानला जातो.