शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

इसिस व अल-काईदात चढाओढ

By admin | Updated: November 22, 2015 03:04 IST

गेल्या काही दिवसांतील दहशतवादी हल्ले पाहता वर्चस्वासाठी इसिस आणि अल-काईदा यांच्यात तीव्र स्पर्धा झाल्याचे दिसून येत असून, त्यात निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत.

बैरूत : गेल्या काही दिवसांतील दहशतवादी हल्ले पाहता वर्चस्वासाठी इसिस आणि अल-काईदा यांच्यात तीव्र स्पर्धा झाल्याचे दिसून येत असून, त्यात निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत.अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अल-कायदा ही संघटना प्रकाशात आली आणि गेल्या १४-१५ वर्षांत याच संघटनेचा बोलबाला होता; पण इराकमध्ये ‘इसिस’चा उदय झाल्यापासून गेल्या दोन वर्षांपासून अल-कायदा मागे पडल्यासारखे वाटत होते. त्यातून आता दोन्ही संघटनांचा वर्चस्वासाठी लढा असल्याचे दिसते.इसिसने इराक आणि सिरियाच्या काही भागात भयंकर नरसंहार करून जगभर दहशत निर्माण केली आहे. त्यातच तीन आठवड्यांपूर्वी २२४ प्रवासी असलेले रशियन विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ते आपणच पाडल्याचा दावा ‘इसिस’ने केला आणि शेवटी तो खरा ठरला.त्यानंतर काही दिवसांतच गेल्या आठवड्यात फ्रान्सची राजधानी पॅरिसवर हल्ला करून ‘इसिस’ने खळबळ माजवली. त्यामुळे ‘इसिस’चे नाव जगभर गाजत असताना अल-कायदाशी निगडित संघटनेने माली या आफ्रिकी देशातील आंतरराष्ट्रीय हॉटेलवर हल्ला करून १०० जणांना ओलिस ठेवले. त्यामुळे सर्वांचे लक्ष पुन्हा अल-कायदाकडे गेले.या घटना पाहता या दोन संघटनांतील स्पर्धा किती तीव्र झाली आहे, हे सोशल मीडियावरून दिसून येते. मालीवरील हल्ल्याबाबत अल-कायदाच्या एका समर्थकाने टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, मालीत त्यांचे (इसिस) अस्तित्व नाही. त्यामुळे ही कारवाई कोणी केली हे अल्लाला ठाऊक. आमच्यापासून ‘इसिस’ला बऱ्याच गोष्टी शिकावयाच्या आहेत.सध्या सिरिया आणि इराकमधील संघर्ष पाहता ‘इसिस’ ही संघटना मूलतत्त्ववादी मुस्लिमांत सर्वाधिक लोकप्रिय आणि ‘प्रेरणादायक’ असल्याचे सोशल मीडियावरून दिसून येत आहे. सिरियातील धोरणावरून अल-काईदा-इसिस यांच्यात फूट पडल्याचा दावा अल-कायदा समर्थकाने केला आहे. (वृत्तसंस्था)