कोबाने शहरावर इसिसचा पुन्हा ताबा

By Admin | Updated: June 25, 2015 23:56 IST2015-06-25T23:56:21+5:302015-06-25T23:56:21+5:30

सिरियात हिंसाचाराचा हैदोस घालणाऱ्या इसिस संघटनेने पुन्हा कोबाने शहरात प्रवेश केला असून, कोबाने शहराजवळील एका गावात २३ कुर्दिश नागरिकांना

Isabella again in the city of Cobain | कोबाने शहरावर इसिसचा पुन्हा ताबा

कोबाने शहरावर इसिसचा पुन्हा ताबा

बैरूत : सिरियात हिंसाचाराचा हैदोस घालणाऱ्या इसिस संघटनेने पुन्हा कोबाने शहरात प्रवेश केला असून, कोबाने शहराजवळील एका गावात २३ कुर्दिश नागरिकांना ठार मारण्यात आले आहे. मृतांत महिला व लहान मुलेही आहेत. सिरियाच्या मानवी अधिकार संघटनेने ही माहिती दिली.
कुर्दिश बंडखोरांनी हे शहर पाच महिन्यांपूर्वी इसिसच्या ताब्यातून सोडविले होते. या शहरात गुरुवारी इसिसचा प्रवेश होताच मोठ्या प्रमाणावर चकमकी व घातपात सुरू झाले आहेत.
गेले चार महिने हे शहर ताब्यात घेण्याचा इसिसचा प्रयत्न चालला होता; पण कुर्दिश बंडखोरांनी अमेरिकी विमान हल्ल्याच्या साहाय्याने हे शहर ताब्यात ठेवले होते. सीमेवरचे हे शहर ताब्यातून जाणे म्हणजे पराभव असे या भागातील गणित आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Isabella again in the city of Cobain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.