पुन्हा एकदा खरी होतेय नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी? प्रिंसेस केट मिडलटनची तब्येत बिघडताच सुरू झाली चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:21 AM2024-03-26T11:21:56+5:302024-03-26T11:22:55+5:30

खरे तर, नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. त्यांनी भारतासंदर्भातही बरीच भाकितं वर्तवली आहेत. याशिवाय त्यांनी क्वीन एलिजाबेथ, हिरोशिमातील हल्ला आणि नेपोलियन संदर्भातही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

Is Nostradamus' prophecy coming true once again The discussion started as soon as Princess Kate Middleton's health deteriorated | पुन्हा एकदा खरी होतेय नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी? प्रिंसेस केट मिडलटनची तब्येत बिघडताच सुरू झाली चर्चा!

पुन्हा एकदा खरी होतेय नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी? प्रिंसेस केट मिडलटनची तब्येत बिघडताच सुरू झाली चर्चा!

इंग्लंडचे राजघराणे सध्या गंभीर आजारांचा सामना करत आहे. प्रिंसेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी नुकतेच, आपल्याला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे आणि आपण केमोथेरेपी घेत आहोत, असे म्हटले आहे. तसेच, किंग चार्ल्सदेखील कॅन्सरवर उपचार घेत आहेत. यातच, 16व्या शतकातील तत्ववेत्ता आणि भविष्यकार नॉस्ट्रॅडॅमस यांच्या भविष्यवाणीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. खरे तर, नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. त्यांनी भारतासंदर्भातही बरीच भाकितं वर्तवली आहेत. याशिवाय त्यांनी क्वीन एलिजाबेथ, हिरोशिमातील हल्ला आणि नेपोलियन संदर्भातही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या पुस्तकात, एका राजाच्या सत्ता त्यागासंदर्भात आणि अनपेक्षित उत्तराधिकारी समोर येण्यासंदर्भात भाष्य केले आहे. वर्तमान स्थितीत हा संदर्भ अथवा ही भविष्यवाणी किंग चार्ल्स आणि प्रिंस हॅरी यांच्यासोबत जोडून बघितला जात आहे. नॉस्ट्रॅडॅमस यांनी आपल्या पुस्तकात लिहिले होते की, आजल्सच्या राजाला जबरदस्तीने सत्तेवरून पायउतार केले जाईल आणि नंतर एक अशी व्यक्ती राज्य करेल, ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

महत्वाचे म्हणजे, वाढलेल्या प्रोस्टेटचा इलाज करताना किंग चार्ल्स यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. यातच, किंग चार्ल्स हे आपल्या इच्छेने अथवा ढासळती प्रकृती आणि दबावामुळे सत्ता सोडू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, प्रिंस हॅरी संदर्भात अद्याप काहीही बोलले जाऊ शकत नाही. राजेशाहीत त्यांना फारसा रस दिसत नाही. मात्र, भविष्यात काय होईल हे सांगितले जाऊ शकत नाही. राजकुमारी केट मिडलटन यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर, आजचे नॉस्टॅडॅमस अर्थात आथोस सालोम यांच्या भविष्यवाणीचीही चर्चा होत आहे.

ब्राझीलच्या या 36 वर्षीय भविष्यवक्त्याने कोरोना व्हायरस, एलन मस्क आणि राजकुमारी केट यांच्या संदर्भात भविष्यवाणी केली होती. येणाऱ्या काळात केट मिडलटन यांना हाडे आणि पायाची समस्या येऊ शकते. याचा ब्रिटेनच्या राजघराण्यावरही मोठा परिणाम होईल, असे भाकितही त्याने वर्तवले होते. यानंतर आता प्रिंस विलियम यांच्या जागी हॅरी हे ब्रिटेनचे राजा होऊ शकतात, असे लोक म्हणत आहेत.
 

Web Title: Is Nostradamus' prophecy coming true once again The discussion started as soon as Princess Kate Middleton's health deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.