शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये आयर्न लेडीचा ऐतिहासिक विजय, बहुमताचा आकडा ओलांडला; पंतप्रधान मोदींनी दिल्य शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 00:32 IST

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पक्षनेतेपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ताकाइची यांनी ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाच देशात 'मिड-विंटर' निवडणुकांची घोषणा केली होती. जनतेकडून नवा जनादेश मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

जपानच्या राजकारणात रविवारी एक नवा इतिहास लिहिला गेला. पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या नेतृत्वाखालील युतीने 'विंटर स्नैप पोल'मध्ये दणदणीत विजय मिळवला. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ताकाइची या ब्रिटनच्या 'आयरन लेडी' मार्गरेट थॅचर यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. ४६५ जागांच्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेला २३३ जागांचा टप्पा सत्ताधारी पक्षाने सहज पार केला. मतमोजणी सुरू झाल्यापासून अवघ्या दोन तासांतच एलडीपीने (LDP) स्वतःच्या बळावर बहुमताचा आकडा गाठला. ही पक्षाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक मानली जात आहे.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन -या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X'वर पोस्ट करत सानाए ताकाइची यांचे अभिनंदन केले. "ऐतिहासिक विजयाबद्दल सानाए ताकाइची यांचे अभिनंदन. भारत आणि जपानमधील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी जागतिक शांतता व समृद्धीसाठी महत्त्वाची आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली ही मैत्री नव्या उंचीवर पोहोचेल, असा मला विश्वास आहे," अशा शब्दांत मोदींनी ताकाइची यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जपानमधील अमेरिकेचे राजदूत जॉर्ज एडवर्ड ग्लास यांनीही या विजयाचे स्वागत करत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली.

३६ वर्षांत पहिल्यांदाच मिड-विंटर' निवडणूक -महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पक्षनेतेपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ताकाइची यांनी ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाच देशात 'मिड-विंटर' निवडणुकांची घोषणा केली होती. जनतेकडून नवा जनादेश मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत गमावलेल्या आणि कोमेतो पक्षासोबतची जुनी युती तुटलेल्या स्थितीत ताकाइची यांनी घेतलेला हा निर्णय एक मोठा राजकीय जुगार मानला जात होता. मात्र, ताज्या निकालांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iron Lady's Historic Win in Japan; PM Modi Congratulates

Web Summary : Sanae Takaichi's coalition secured a resounding victory in Japan's elections. Inspired by Margaret Thatcher, Takaichi led her party to a majority in the lower house. PM Modi congratulated her, emphasizing the importance of Indo-Japanese relations for global peace. She held mid-winter elections after 36 years.
टॅग्स :JapanजपानElectionनिवडणूक 2026Narendra Modiनरेंद्र मोदी