शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयर्लंडमध्ये अचानक ४०० घरे करावी लागली रिकामी, लोकांना पाठवलं दूर, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 09:43 IST

अचानक ही कारवाई करण्यामागे नक्की काय कारण आहे, जाणून घ्या.

Ireland, 400 Houses Evacuated: जगात सध्या राजकीय परिस्थिती फारच भीषण होत चालली आहे. एकीकडे रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. दुसरीकडे हमास-इस्रायल-इराण यांच्यातही हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत. अशातच आता इतिहासातील एका गोष्टीमुळे युरोपात एकच खळबळ उडाली. आयर्लंडमधील तब्बल ४०० घरे तातडीने रिकामी करण्यात आली. इतक्या अचानक असा निर्णय का घेतला गेला? जाणून घेऊया सविस्तर.

युरोपीय देश आयर्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धातील काही संशयित बॉम्बचे भाग सापडले. त्यानंतर कोणत्याही प्रकारची भयंकर घटना टाळण्यासाठी ४०० घरे रिकामी करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित हे उपकरण शुक्रवारी आयर्लंडमधील काउंटी डाउन भागातील न्यूटाउनर्ड्समधील रिव्हनवुड बांधकामाच्या साइटवर सापडले. त्यानंतर पोलिसांनी या भागात तपास व चौकशी सुरू केली आहे.

परिसरात उत्खनन करून कोणत्याही प्रकारचा बॉम्ब बाहेर काढण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. बॉम्ब निकामी करणारे युनिट सध्या साइटवर आहे. नियोजित नियंत्रित स्फोटापूर्वी उपकरणावर वाळूचा ढीग करण्यासाठी लष्करी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली खोदकाम करणाऱ्यांचा वापर केला जात आहे. या कारवाईला ५ दिवस लागतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

संशयास्पद वस्तू कशी सापडली?

बांधकाम साइटचे विकसक जेम्स फ्रेझर यांनी सांगितले की, या भागात बरेच बांधकाम सुरू आहे, तेथे ४० हून अधिक घरे बांधली जात आहेत. या उत्खननादरम्यान कामगारांना बॉम्बसारखे काहीतरी संशयास्पद आढळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ४०० घरे रिकामी केली.

पोलिसांनी नोटीस बजावली

शुक्रवारी बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या परिसरात नोटीस जारी करून बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून ४०० मीटरपर्यंतची सर्व घरे खाली करण्याचे आदेश दिले. खोदकामात कोणतीही जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या लोकांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले.

पोलीस काय म्हणाले?

बॉम्बसदृश संशयित वस्तू योग्यपद्धतीने जमिनीच्या आतून बाहेर काढण्यासाठी सशस्त्र दलाचे सदस्य शनिवारी घटनास्थळी पोहोचले, असे स्थानिक नगरसेवकाने सांगितले. अधीक्षक जॉन्स्टन मॅकडॉवेल म्हणाले, जे लोक घरं रिकामी करुन कारवाईचे महत्त्व समजून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

टॅग्स :Irelandआयर्लंडPoliceपोलिस