बगदाद: अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या दोन आठवड्यांच्या 'सीझफायर' (युद्धविराम) निर्णयानंतर इराकने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. इराकच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने देशाचे हवाई क्षेत्र आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा खुले करण्याची घोषणा केली आहे. तब्बल ४० दिवसांच्या प्रदीर्घ बंदीनंतर इराकने हे पाऊल उचलले आहे.
२८ फेब्रुवारी रोजी इराण-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इराकने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले होते. यामुळे आशिया आणि युरोपला जोडणारा एक प्रमुख हवाई मार्ग खंडित झाला होता. मात्र, बुधवारी (८ एप्रिल २०२६) सायंकाळपासून ही बंदी उठवण्यात आली असून, आता व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू होत आहेत. यामध्ये टेकऑफ, लँडिंग आणि इराकच्या हवाई क्षेत्रातून होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे यांचा समावेश आहे.
विमान कंपन्यांना मोठा दिलासाइराकचे हवाई क्षेत्र बंद असल्याने विमान कंपन्यांना पर्यायी लांबच्या मार्गांचा वापर करावा लागत होता, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च प्रचंड वाढला होता. आता हा मार्ग खुला झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार असून विमान कंपन्यांच्या खर्चातही घट होणार आहे. इराक सरकारने म्हटले आहे की, ते एअर सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या जागतिक मानकांचे काटेकोरपणे पालन करतील.
युद्धाचा इराकवर झालेला परिणामया ४० दिवसांच्या बंदीमुळे इराकच्या तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज सुमारे ७५० ते ८५० आंतरराष्ट्रीय विमाने इराकच्या आकाशातून प्रवास करतात, ज्यातून देशाला मोठा महसूल मिळतो. आता परिस्थिती पुन्हा सामान्य होत असल्याने बगदाद, एरबिल आणि बसरा यांसारख्या प्रमुख विमानतळांवर पुन्हा लगबग सुरू झाली आहे.
Web Summary : Following a ceasefire between the US and Iran, Iraq has reopened its airspace and international airports after a 40-day closure. This move provides relief to airlines, shortening routes and reducing fuel costs. The reopening boosts Iraq's economy, which suffered losses during the airspace ban.
Web Summary : अमेरिका और ईरान के बीच संघर्ष विराम के बाद इराक ने 40 दिनों बाद अपना हवाई क्षेत्र और अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे फिर से खोल दिए हैं। इस कदम से विमान कंपनियों को राहत मिली है, मार्ग छोटे हो गए हैं और ईंधन की लागत कम हो गई है। हवाई क्षेत्र पर प्रतिबंध के दौरान हुए नुकसान के बाद यह कदम इराक की अर्थव्यवस्था को बढ़ावा देगा।