शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इराणची तीन 'गुप्त शहरं'! अमेरिका-इस्रायलच्या छातीत धडकी भरवणारी 'मिसाईल सिटी' नेमकी काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 21:25 IST

'८६ व्या लाटे'च्या (86th Wave) हल्ल्यांच्या चर्चेत आता अशा तीन तळांचा उल्लेख होतोय, जे युद्धाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवतात.

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आता इराणच्या तीन गुप्त तळांची चर्चा रंगली आहे. 'मिसाइल सिटी', 'टनल आर्मी' आणि 'अंडरग्राउंड बेस'ने सज्ज असलेले हे तळ कोणत्याही जमिनी युद्धासाठी मोठे आव्हान ठरू शकतात. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यांनी जागतिक चिंता वाढवली आहे. '८६ व्या लाटे'च्या  हल्ल्यांच्या चर्चेत आता अशा तीन तळांचा उल्लेख होतोय, जे युद्धाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवतात.

भारताच्या ऊर्जा क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात! २.६ लाख चौरस किमी क्षेत्रावर खनिज तेलाचा शोध; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केश्म बेट: होर्मुजचा 'गेटकीपर'

​होर्मुजच्या सामुद्रधुनीच्या मुखाशी असलेले केश्म बेट हे इराणचा सागरी किल्ला मानले जाते. धोरणात्मकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून, येथून जागतिक तेल पुरवठ्यावर नियंत्रण मिळवता येते. डोंगरांच्या खाली असलेल्या भूमिगत मिसाईल सेलर्सचे जाळे थेट समुद्राच्या दिशेने उघडते. या तळांवर अँटी-शिप मिसाईल्स आणि 'सुसाईड ड्रोन' तैनात असल्याचे सांगितले जाते, जे शत्रूच्या युद्धनौकांना लक्ष्य करू शकतात.

 खोरगो: बॅलिस्टिक पॉवरहाऊस

दुसरे गुप्त ठिकाण खोरगो आहे. याला इराणचे 'बॅलिस्टिक पॉवरहाऊस' म्हटले जाते. जमिनीच्या शेकडो फूट खाली सिमेंट-काँक्रीटपासून बनवलेले 'व्हर्टिकल मिसाईल सायलो' येथे असल्याचा अंदाज आहे. येथूनच 'खैबर शिकन' सारख्या क्षेपणास्त्रांद्वारे आखाती देशांतील अमेरिकन तळांवर हल्ला केला जाऊ शकतो.

 हाजी अबाद: मिसाईल टनल सिटी

​तिसरे आणि सर्वात रहस्यमय ठिकाण म्हणजे हाजी अबाद. याला इराणची 'मिसाईल टनल सिटी' म्हणतात. डोंगरांच्या आत लांब बोगद्यांचे जाळे पसरलेले आहे. या बोगद्यांमध्ये 'मोबाईल मिसाईल लाँचर्स' तैनात आहेत, जे 'शूट अँड स्कूट' (हल्ला करा आणि लपा) या रणनीतीनुसार वेगाने हल्ला करून आपली जागा बदलू शकतात.

​डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि वाढता संघर्ष

​या तळांमुळे अमेरिकेला जमिनीवर मोठी लष्करी कारवाई करणे जड जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला असून दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. इराणने असा आरोप केला आहे की, अमेरिकन हल्ल्यांमध्ये लामर्डमधील निवासी भाग आणि एका स्पोर्ट्स हॉलला लक्ष्य करण्यात आले आहे.

​डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "इराणला आपला अणुऊर्जा कार्यक्रम सोडावा लागेल, अन्यथा त्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते." १७ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात त्यांनी याला 'शतरंजच्या खेळा'ची उपमा दिली आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे सांगितले. जर इराणने अटी मान्य केल्या, तर तो पुन्हा एक महान देश बनू शकतो, असेही ते म्हणाले.

​जागतिक धोका वाढतोय का?

​तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे वाढते दडपण अनेक देशांना सुरक्षेसाठी अण्वस्त्रांकडे वळण्यास भाग पाडू शकते. इराणवरील कारवाई, व्हेनेझुएलातील हस्तक्षेप आणि ग्रीनलँड-पनामाबाबतची विधाने यामुळे जग एका नवीन आणि धोकादायक भू-राजकीय कालखंडाकडे जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्याची परिस्थिती अशा वळणावर आहे जिथे प्रत्येक पाऊल जागतिक संतुलनावर परिणाम करू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's three secret cities threaten US-Israel amid rising tensions.

Web Summary : Iran's hidden missile cities, 'Tunnel Army,' and underground bases pose a challenge amid US-Israel tensions. These strategic sites, including Kheshm Island, Khorgo, and Haji Abad, could shift war dynamics, raising global concerns over potential nuclear proliferation.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण