शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:23 IST

अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी तथा अमेरिकन एंटरप्राइज इंस्टिट्यूटचे वरिष्ठ विश्लेषक मायकल रूबिन यांनी अनेक मोठे दावे केले आहेत.

इस्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू असले तरी, सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, त्या अमेरिकेकडे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दात धमकावले आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर यांना जेवणासाठी व्हाइट हाऊस येथे आमंत्रित केले होते. या भेटीसंदर्भात जागतिक राजकारणात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. 

यातच आता अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी तथा अमेरिकन एंटरप्राइज इंस्टिट्यूटचे वरिष्ठ विश्लेषक मायकल रूबिन यांनी अनेक मोठे दावे केले आहेत. ते म्हणाले, इराणवरील संभाव्य कारवाईनंतर, त्यांचे अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित साहित्य पाकिस्तानात हलवले जाऊ शकते. केवळ यासाठीच ट्रम्प प्रशासन पाकिस्तानचा विचार करत असावा.

कदाचित यासाठीही पाकिस्तानची निवड होऊ शकते?यासंदर्भात बोलताना मायकल रूबिन म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला अमेरिकेचा मित्र म्हणत आहेत, कारण त्यांना या मैत्रीतून काही तरी साध्य करायचे आहे. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करण्याची अमेरिकेची इच्छा आहे. असे झाल्यास, अमेरिकेला संबंधित अण्वस्त्र साहित्य कुठे ना कुठे हलवावेच लागेल. कदाचित यासाठी पाकिस्तानचीही निवड होऊ शकते."

आता प्रश्न असा निर्माण होतो की, ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला एखादी मोठी भूमिका पार पाडायला सांगितली, तर पाकिस्तान विरोध करू शकेल? पाकिस्तान हा आपला आवडाता मित्र देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. आता याच गोष्टीचा राजनयिक दबावासाठीही वापर केला जाऊ शकतो.

खाजगीत धमकी...?मायकल रुबिन म्हणाले, "खरे तर, आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांपेक्षाही अधिक ताकद लष्करप्रमुख मुनीर यांच्याकडे आहे. ट्रम्प यांनी त्यांना खाजगीत धमकी दिली असावी आणि ते सार्वजनिकरित्या मैत्रीपूर्ण संबंध भासवत असावेत, असेही असू शकते."

इराण विरोधात लष्करी तळांचा वापर? -महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान-इराणची सीमा सुमारे ९०० किलोमीटर लांब आहे. यादृष्टीने अमेरिकेला पाकिस्तानचा उपयोग होऊ शकतो. अफगाणिस्तान युद्धातही पाकिस्तानने अमेरिकेला मोठी लष्करी मदत केली होती. याशिवाय, अमेरिका इराणवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानचे हवाई हद्दीचीही मागणी करू शकतो. यापूर्वी, अफगाणिस्तानातील अमेरिकन कारवायांसाठीही पाकिस्नानने अमेरिकेसाठी आपले हवाई क्षेत्र खुले केले होते. तसे यावेळी ही होऊ शकते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानIranइराणrussiaरशिया