अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते (Supreme Leader) मुज्तबा खामेनेई युद्धाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. असा दावा 'न्यूयॉर्क टाइम्स'ने केला आहे. याशिवाय, इराण आणि इस्रायली अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुज्तबा यांच्या पायाला दुखापत -अहवालानुसार, युद्ध सुरू होताच अमेरिका आणि इस्रायलने तेहरानमधील सर्वोच्च नेत्यांच्या निवासस्थानावर (कंपाऊंड) जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात मुज्तबा यांचे वडील आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. तसेच, याच हल्ल्यात मुज्तबा यांची आई, पत्नी, एक मुलगा आणि अनेक उच्चपदस्थ संरक्षण अधिकारीही मारले गेले. मुज्तबा खामेनेई या हल्ल्यातून बचावले असले तरी ते जखमी झाले आहेत. सध्या ते एका उच्च सुरक्षा असलेल्या गुप्त ठिकाणी असून, तेथील संपर्क यंत्रणा अत्यंत मर्यादित आहेत. तीन इराणी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुज्तबा यांच्या पायाला दुखापत झाली आहे, मात्र ते शुद्धीत आहेत.
८ मार्च रोजी मुज्तबा खामेनेई यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड -वडिलांच्या निधनानंतर ८ मार्च रोजी मुज्तबा खामेनेई यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली. मात्र, तेव्हापासून ते सार्वजनिकरित्या किंवा व्हिडिओ संदेशाद्वारे समोर आलेले नाहीत. इराणी सरकारी प्रसारमाध्यमांनी त्यांचे वर्णन 'जखमी युद्ध वेटरन' (Injured War Veteran) असा केले आहे.दरम्यान, मोज्तबा हे कमांडर-इन-चीफची भूमिका बजावत आहेत का? असा प्रश्न केला असता, इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाकेई यांनी थेट भाष्य करणे टाळले. मात्र, "ज्यांना संदेश मिळायला हवा होता, त्यांना तो मिळाला" आहे," असे सूचक विधान केले आहे. सध्या तेहरानमध्ये मुज्तबा यांचे मोठे बॅनर्स आणि पत्रके लावण्यात आली आहेत. यातून त्यांना इराणचे नवे नेतृत्व म्हणून दाखवण्यात आले आहे.
Web Summary : Iran's new Supreme Leader Mojtaba Khamenei was reportedly injured in a Tehran attack during the ongoing conflict. His father died in the attack. He was chosen Supreme Leader on March 8th. Iranian media calls him 'Injured War Veteran'.
Web Summary : तेहरान में हमले में ईरान के नए सर्वोच्च नेता मुजतबा खामेनेई घायल हो गए। हमले में उनके पिता की मौत हो गई। उन्हें 8 मार्च को सर्वोच्च नेता चुना गया था। ईरानी मीडिया उन्हें 'घायल युद्ध अनुभवी' कहती है।