शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा इस्रायलवर 'नसरल्लाह' प्रहार! ऑईल रिफायनरी उद्ध्वस्त; नव्या मिसाईलने युद्धात आणलं वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:32 IST

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-४' अंतर्गत इस्रायलवर ६५ व्या टप्प्यातील मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

मध्य पूर्वेतील युद्धाने आता अत्यंत भयानक वळण घेतले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-४' अंतर्गत इस्रायलवर ६५ व्या टप्प्यातील मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इराणने पहिल्यांदाच आपल्या 'नसरल्लाह' या अत्याधुनिक बॅलिस्टिक मिसाईल्सचा वापर केला असून, याद्वारे इस्रायलच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात येत आहे.

काय आहे 'नसरल्लाह' मिसाईल?

हिजबुल्लाहचा दिवंगत नेता हसन नसरल्लाह याच्या नावावरून इराणने या क्षेपणास्त्राचे नाव ठेवले आहे. हे क्षेपणास्त्र इराणच्या जुन्या 'कादर' मालिकेचे प्रगत व्हर्जन मानले जाते. हे एक 'प्रिसिजन-गायडेड' बॅलिस्टिक मिसाईल असून, अत्यंत महत्त्वाच्या आणि सुरक्षित लक्ष्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी ते डिझाइन केले गेले आहे.

या मिसाईलची घातक वैशिष्ट्ये:

मल्टी-वारहेड क्षमता: हे मिसाईल एकाच वेळी अनेक स्फोटके वाहून नेऊ शकते, ज्यामुळे एकाच फटक्यात अनेक लक्ष्यांवर किंवा मोठ्या रिफायनरीवर हल्ला करणे शक्य होते.

प्रचंड वेग : ध्वनीच्या वेगापेक्षा ५ पटीने अधिक वेग असल्याने, इस्रायलची 'आयरन डोम' किंवा अमेरिकेची 'पॅट्रियट' ही संरक्षण यंत्रणा भेदणे या मिसाईलसाठी सोपे आहे.

१५०० ते २००० किमी रेंज: इराणमधून थेट इस्रायल किंवा आखाती देशांतील अमेरिकन तळांवर हे मिसाईल अचूक मारा करू शकते.

अचूक निशाणा: नवीन गायडन्स तंत्रज्ञानामुळे हे क्षेपणास्त्र एअरबेस, कमांड सेंटर्स आणि ऊर्जा केंद्रांना शोधून नष्ट करते.

नेतान्याहूंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी काही काळापूर्वी दावा केला होता की, इराणची क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आली आहे. मात्र, इराणने ज्या पद्धतीने ६५ व्या लाटेत सलग हल्ले सुरू ठेवले आहेत आणि 'नसरल्लाह' सारखी नवीन अस्त्रे बाहेर काढली आहेत, त्यावरून इराणची लष्करी उत्पादन क्षमता आजही सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.

जागतिक चिंता वाढली

इराणच्या या हल्ल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती आणि ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. इराणने दिलेला हा केवळ लष्करी इशारा नसून, आपल्या तांत्रिक प्रगतीचा पुरावा असल्याचे संरक्षण तज्ञांचे मत आहे. या नवीन मिसाईलच्या एंट्रीमुळे मिडल ईस्टमध्ये आता दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran strikes Israel with 'Nasrallah' missile, escalating Middle East conflict.

Web Summary : Iran launched 'Operation True Promise-4' against Israel, deploying the advanced 'Nasrallah' missile targeting oil refineries. This precision-guided weapon, named after a Hezbollah leader, can carry multiple warheads and evade defense systems, raising global concerns over escalating tensions and energy security in the Middle East.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर