शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

400 सेकेंदांत इस्रायलमध्ये धडकलं इराणचं हायपरसोनिक मिसाइल, आयरन डोमही ठरलं फेल! अशी आहे 'खासियत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 14:09 IST

...अर्थात हे मिसाइल इराणमधून लॉन्च केल्यास तेल अवीव पर्यंत केवळ 400 सेकंदांत पोहोचेल. अर्थात केवळ सडे 6 मिनिटांत.

इरानने 13 एप्रिल 2024 रोजी इस्रायलवर हल्ला मिसाइल हल्ला केला. यापूर्वी इराणने आपल्या मुख्य शहरांमधील इमारतींवर हायपरसोनिक मिसाइलचे होर्डिंग्स लावले होते आणि यावर, 400 सेकेंदांत तेल अवीव, असे लिहिले होते. अर्थात हे मिसाइल इराणमधून लॉन्च केल्यास तेल अवीव पर्यंत केवळ 400 सेकंदांत पोहोचेल. अर्थात केवळ सडे 6 मिनिटांत. 'फतह' असे या मिसाइलचे नाव आहे.

हे मध्यम पल्ल्याचे मिसाइल आहे. याची रेंज 1400 किलोमीटर एवढी आहे. याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 15 पट अधिक आहे. म्हणजेच ताशी 17.9 हजार किलोमीटर. खरे तर, अनेकांना वाटत होते की इस्रायलचे आयर्न डोम आणि इतर हवाई संरक्षण यंत्रणा इराणचे सात बॅलिस्टिक मिसाइल रोखू शकणार नाही. ते फतह हायपरसॉनिक मिसाईल होते. ज्याला इस्रायलची कोणतीही हवाई संरक्षण यंत्रणा रोखू शकली नाही. हेच सात मिसाइल्स इस्रायलच्या नेवाटीम एअरबेसवर पडले.

इराणच्या हायपरसोनिक मिसाइल पुढे आयरन डोम फेल -इराणने ड्रोन्स आणि रॉकेट्सच्या सहाय्याने इस्रायलवर जवळपास सोबतच हल्ला केला. याच वेळी, इस्रायली डिफेंस फोर्सेस, अमेरिकन नौदलाची विमानवाहू युद्धनौका आणि इस्रायली आयरन डोम यांनी हे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. मात्र तरीही इराणच्या हायपरसोनिक मिसाइल्सनी इस्रायलचे रक्षण कवच भेदले. हे सर्व आपल्या टार्गेटवर पडले.

अशी आहे इराणच्या हायपरसोनिक मिसाइलची 'खासियत' - फतह हे एक मध्यम पल्ल्याचे हायपरसोनिक मिसाइल आहे. यात 350 ते 450 किलो वजनाचे वॉरहेड बसवले जाते. या मिसाइलसाठी सॉलिड इंधनाचा वापर केला जातो. याची रेंज 1400 किमी एवढी आहे. तर वेग 16,052 किमी/तास ते 18,522 किमी/तास एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, हे मिसाइल केव्हाही कोणत्याही दिशेला वळवले जाऊ शकते. अर्थात टार्गेट मिस होऊच शकत नाही. तसेच हे मिसाईल सहजपणे कुठल्याही रडारच्या नजरेत येत नाही.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध