शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली युद्धाची धमकी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 22:10 IST

अमेरिका आणि इराणमधील संबंध आणखी बिघडले आहेत.

America-Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इराणने अणुकरार मान्य न केल्यास बॉम्बफेक करण्यात येईल, अशी थेट धमकी त्यांनी इराणला दिली आहे. याशिवाय इराणला कठोर आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. यामुळे या दोन्ही देशातील संबंध अधिक बिघडू शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, आवश्यक पातळीपेक्षा जास्त युरेनियम समृद्ध इराण गुप्तपणे अण्वस्त्रे बनवण्याचे काम करत असल्याचा पाश्चात्य देशांचा दावा आहे. पण, इराण हे आरोप फेटाळून लावतो आणि त्यांचा कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण हेतूंसाठी असल्याचा दावा करतो. अशातच, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमासंदर्भातील पत्राला उत्तर म्हणून अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिडले आणि त्यांनी इराणला बॉम्बची धमकी दिली. 

इराण आणि अमेरिकेतील वाढता तणाव 2018 पासून अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, गाझामध्ये इस्रायल-हमास संघर्षादरम्यान इराण समर्थित गटांच्या नेत्यांवरही हल्ले झाले. सध्या, अमेरिका येमेनमधील हुथी बंडखोरांवर हवाई हल्ले करत आहे, ज्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष अधिक गडद झाला आहे. याशिवाय इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत लष्करी कारवाईची भीती अजूनही कायम आहे. इराणने आपल्या आण्विक कार्यक्रमाबाबत कोणताही तोडगा काढला नाही, तर अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांची प्रतिक्रिया अधिक कडक होऊ शकते, असे मानले जात आहे.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराणwarयुद्ध