शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा मोठा गौप्यस्फोट: अमेरिकन हल्ल्यात सर्व अणुकेंद्रे उद्ध्वस्त; युरेनियमचे साठे ढिगाऱ्याखाली दाबले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:00 IST

तेहरान/वॉशिंग्टन: अमेरिकेने केलेल्या भीषण बॉम्बफेकीत इराणची अणुकेंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तेथील आण्विक साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा खळबळजनक दावा ...

तेहरान/वॉशिंग्टन: अमेरिकेने केलेल्या भीषण बॉम्बफेकीत इराणची अणुकेंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तेथील आण्विक साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा खळबळजनक दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आशिया खंडात रेडिएशनचा (किरणोत्सर्ग) धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अराघची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या महत्त्वाच्या अणू प्रकल्पांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या सर्व काही ढिगाऱ्याखाली आहे. आमचे आण्विक साहित्य गाडले गेले आहे,असे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, इतके नुकसान सोसूनही इराण कोणत्याही परिस्थितीत युद्धविराम करणार नाही. उलट, इराणने अमेरिकेला आणखी मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.

हे युरेनियम आताच बाहेर काढण्याचा सरकारचा इरादा नाही. भविष्यात ते जर बाहेर काढण्याचा निर्णय झालाच तर आंतरराष्ट्रीय आण्विक संस्थेच्या निरीक्षणाखालीच बाहेर काढण्यात येईल. आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करत असताना युरेनियमचा समृद्ध साठा ६० टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचा शब्द दिला होता. हा आकडा अत्यंत आश्वासक होता, यामुळे इराण अण्वस्त्र तयार करणार नाही, हे स्पष्ट होत होते. परंतू, तरीही अमेरिकेने इस्रायलच्या साथीने आमच्यावर हल्ला केला, असा आरोप अराघची यांनी केला आहे. 

रेडिएशनचा धोका वाढला?अणुकेंद्रावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात रेडिएशन पसरण्याची दाट शक्यता आहे. जर हे आण्विक अवशेष वेळीच सुरक्षित केले नाहीत, तर त्याचा परिणाम केवळ इराणवरच नाही, तर शेजारील देशांवरही होऊ शकतो. अमेरिकेने मात्र इराणचा हा दावा फेटाळून लावत म्हटले आहे की, त्यांनी केवळ लष्करी तळांनाच लक्ष्य केले आहे.

संघर्षाची तीव्रता वाढलीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला होता की, इराणच्या आण्विक क्षमतेला अमेरिका पूर्णपणे संपवून टाकेल. अणुकेंद्रावर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इराण आता इस्रायल आणि अमेरिकन तळांवर 'सेज्जिल' आणि इतर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर अधिक वेगाने करण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Claims US Attack Destroyed Nuclear Sites, Uranium Stockpiles Buried

Web Summary : Iran alleges a US bombing destroyed its nuclear sites, burying uranium. Radiation risk looms, impacting neighboring countries. Iran vows retaliation despite significant damage and denies willingness to negotiate with the US.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका