शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चीनी बंदरातून युद्धाच्या रसायनांनी भरलेली इराणची जहाजे निघाली; रॉकेट इंधन पुरवल्याचा संशय, अमेरिका पोहोचू देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:43 IST

Iran Ships leave China with Warfare: चीनमधून निघालेली इराणची जहाजे 'शब्दीस' आणि 'बर्जिन' मलक्का सामुद्रधुनीजवळ पोहोचली. ६,००० किमीचा प्रवास आणि अमेरिकन नेव्हीचा धोका. वाचा सागरी युद्धाचे ताजे अपडेट.

मध्य आशियातील वाढत्या तणावादरम्यान एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनच्या एका प्रमुख बंदरातून इराणची काही मालवाहू जहाजे रवाना झाली असून, त्यामध्ये लष्करी वापरासाठीची घातक रसायने आणि रॉकेट इंधन असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे इराण-इस्रायल युद्धाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या जहाजांमध्ये अशा रसायनांचा साठा आहे जो क्षेपणास्त्रे आणि रॉकेट तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. इराणवर पाश्चात्य देशांनी अनेक निर्बंध लादलेले असताना, चीन उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने इराणला लष्करी मदत करत असल्याचे यातून दिसून येत आहे. हे रॉकेट इंधन इराणच्या 'बॅलिस्टिक मिसाईल' कार्यक्रमासाठी वापरले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे इस्रायलवरील धोक्यात वाढ झाली आहे. या घडामोडींमुळे अमेरिका आणि युरोपीय देशांनी चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, जागतिक राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.

४ मार्च रोजी हिंदी महासागरात अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणची बलाढ्य युद्धनौका 'IRIS Dena' हिला टार्गेट करून समुद्रात बुडविल्याने इराणच्या जहाजांनी वेगवेगळे मार्ग पकडले आहेत. ही युद्धनौका प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ३ हजार किलोमीटर लांब असतानाही अमेरिकेने Mk-48 टॉरपिडोचा वापर करून तिला उद्ध्वस्त केले. अशातच चीनमधून इराणकडे निघालेली 'शब्दीस' आणि 'बर्जिन' ही दोन जहाजे सध्या अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. या जहाजांमध्ये रॉकेट इंधन आणि लष्करी रसायने असल्याचा संशय असल्याने अमेरिका त्यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मार्गात बदल आणि एस्कॉर्टअमेरिकेच्या धास्तीने इराणची 'हमुना', 'अबियान' आणि 'अर्जिन' ही तीन जहाजे आपला नियमित मार्ग सोडून खुल्या समुद्रातून प्रवास करत आहेत. हे दोन महत्वाचे जहाज सुरक्षित नेण्यासाठी इराणची IRGC नेव्ही त्यांना संरक्षण देण्याची शक्यता आहे. चीनमधून निघालेले बर्जिन हे जहाज सध्या मलेशियाच्या किनाऱ्याजवळ नांगर टाकून उभे आहे. इथून इराणचे अब्बास बंदर सुमारे ६,४०० किमी अंतरावर आहे. हे जहाज पुढील प्रवासासाठी अनुकूल संधीची वाट पाहत असल्याचे समजते. तर शब्दीस' हे जहाज व्हिएतनामच्या समुद्री सीमा ओलांडून पुढे सरकत आहे. या जहाजाला सुमारे ७,२०० किमीचा प्रवास करून इराणच्या चाबहार बंदरात पोहोचायचे आहे.

भारतासाठी चिंता का?मलक्का सामुद्रधुनी हा जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्ग आहे. इथूनच अंदमान समुद्रात प्रवेश होतो. अमेरिकेने यापूर्वीच इराणची एक युद्धनौका हिंदी महासागरात बुडवली असल्याने, या दोन जहाजांवर हल्ला झाल्यास भारतीय सागरी क्षेत्रातील व्यापारी वाहतुकीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Ships Carrying War Chemicals from China: US Intervention?

Web Summary : Iranian ships, suspected of carrying rocket fuel and war chemicals from China, are under US scrutiny amid rising tensions. The US Navy previously targeted an Iranian warship. India worries about potential disruption to maritime trade routes if conflict escalates.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाchinaचीन