मध्यपूर्वेतील इराणसोबतच्या युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक राजकारण तापले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांच्याशी झालेल्या संवादात जुन्या जखमांना उजाळा दिला आहे. "जेव्हा तुम्ही (जपान) पर्ल हार्बरवर हल्ला केला होता, तेव्हा आम्हाला कल्पना का दिली नव्हती?" असा रोखठोक आणि उपरोधिक सवाल ट्रम्प यांनी ताकाइची यांना विचारला आहे.
इराणने कतार आणि सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवर मिसाईल हल्ले केल्यानंतर, 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील सुरक्षा धोक्यात आली आहे. जपानच्या गरजेपैकी ९०% तेल याच मार्गावरून येते. जेव्हा पंतप्रधान ताकाइची यांनी या भागात अमेरिकेच्या लष्करी मदतीबाबत चर्चा केली, तेव्हा ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' धोरणाचा पुनरुच्चार केला. ट्रम्प यांच्या मते, जपानने स्वतःच्या तेल पुरवठ्याचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे सैन्य आणि खर्च उचलला पाहिजे, कारण अमेरिका आता इतरांच्या संरक्षणाची फुकट जबाबदारी घेणार नाही.
पर्ल हार्बरचा उल्लेख का?१९४१ मधील पर्ल हार्बर हल्ल्याचा संदर्भ देऊन ट्रम्प यांनी जपानला हे सुचवण्याचा प्रयत्न केला की, जपान जेव्हा स्वतःच्या हितासाठी आक्रमक होऊ शकतो, तर आता स्वतःच्या तेलाच्या संरक्षणासाठी त्यांनी मागे का राहावे? ताकाइची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून त्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या मानल्या जातात. तरीही ट्रम्प यांच्या या अनपेक्षित विधानामुळे जपानच्या राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जपानची कोंडी?जपानच्या तेल आयातीचा मोठा हिस्सा इराणजवळील 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून येतो. तरीही जपान या भागात सक्रिय लष्करी भूमिका घेण्यास कचरत आहे. ट्रम्प यांनी 'पर्ल हार्बर'चा संदर्भ देऊन हे स्पष्ट केले की, आता जपानने केवळ अमेरिकेच्या जीवावर अवलंबून न राहता स्वतःच्या व्यापारी मार्गांचे रक्षण स्वतः करावे.
Web Summary : Trump questioned Japan's PM about Pearl Harbor during Iran tensions, urging Japan to protect its own oil supply and not rely on the US amid Strait of Hormuz concerns. He suggested Japan should defend its interests.
Web Summary : ईरान तनाव के बीच ट्रंप ने जापान के पीएम से पर्ल हार्बर के बारे में सवाल किया, जापान को अपनी तेल आपूर्ति की रक्षा करने और होर्मुज जलडमरूमध्य की चिंताओं के बीच अमेरिका पर निर्भर नहीं रहने का आग्रह किया। उन्होंने सुझाव दिया कि जापान को अपने हितों की रक्षा करनी चाहिए।