शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 08:58 IST

Iran War News: इराणमध्ये अमेरिकन सैनिकाच्या सुटकेसाठी अमेरिकन सैन्यदलाने राबवलेल्या बचाव मोहिमेच्या एका पेक्षा एक सुरस कहाण्या आता समोर येत आहेत. त्यात आता खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या भूमीवर अडकलेल्या त्या सैनिकाने कशाप्रकारे शौर्य दाखवत स्वत:चा बचाव केला याची थरारक माहिती दिली आहे.  

आखातामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. या संघर्षादरम्यान, अमेरिकेचं ए-१५ हे लढाऊ विमान इराणने पाडलं होतं. मात्र या विमानातील एक वैमानिक आणि एक वेपन सिस्टिम ऑफिसर बचावले होते. त्यापैकी वैमानिकाची अमेरिकन सैन्याने तातडीने सुटका केली होती. तर दुसऱ्या अमेरिकन सैनिकाच्या सुटकेसाठी अमेरिकन सैन्यदलाने राबवलेल्या बचाव मोहिमेच्या एका पेक्षा एक सुरस कहाण्या आता समोर येत आहेत. त्यात आता खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या भूमीवर अडकलेल्या त्या सैनिकाने कशाप्रकारे शौर्य दाखवत स्वत:चा बचाव केला याची थरारक माहिती दिली आहे.

गुरुवारी रात्री इराणमध्ये हल्ले करत असताना अमेरिकेचे एफ-१५ हे लढाऊ विमान इराणमध्ये कोसळले होते. मात्र हे विमान कोसळत असताना त्यातील वैमानिक आणि वेपन सिस्टिम ऑफिसर हे सुखरूपपणे इजेक्ट करण्यात यशस्वी ठरले होते. मात्र वेग जास्त असल्याने ते एकमेकांपासून खूप लांब अंतरावर उतरले होते. यातील वैमानिकाला अमेरिकन सैन्याने तातडीने वाचवले. मात्र वेपन सिस्टिम ऑपरेटर इराणच्या भूमीवर अडकला होता.

हा वेपन सिस्टिम ऑपरेटर गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या आजूबाजूच्या भागात इराणचे सैनिक, रिवोल्युशनरी गार्ड शोध घेत होतो. अशा परिस्थितीत या अधिकाऱ्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रयत्नन सुरू केले. शत्रू आपल्या जवळ पोहोचू नयेत, यासाठी हा अधिकारी जखमी असूनही डोंगराळ प्रदेशात वरच्या दिशेने चढाई करत राहिला. यादरम्यान, त्याच्या शरीरातून भळाभळा रक्त वाहत होतं. मात्र तो कड्याकपारीतून वर चढत राहिला. त्याने स्वत:ला झालेल्या जखमांवर मलमपट्टी केली आणि त्याच्याजवळ असलेल्या विशेष लोकेशन ट्रान्समीटर डिव्हाईसच्या मदतीने अमेरिकन सैन्याला आपल्या जागेची माहिती देण्यास सुरुवात केली. सुमारे ४८ तास तो शत्रूच्या भूमीवर लपून स्वत:चा बाचव करण्यात यशस्वी ठरला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या  मोहिमेबाबत आणखी माहिती देताना सांगितले की, अमेरिकन सैन्याचं एक तत्त्व आहे, आम्ही आपल्या कुठल्याही सैनिकाला मागे सोडत नाही. मागच्या ३७ दिवसांमध्ये आमेरिकेने इराणवरून १० हजारांहून अधिक उड्डाणे केली आहेत. तसेच सुमारे १३ हजारांहून अधिक ठिकाणी हल्ले केले आहेत. एवढ्या मोठ्या मोहिमेमध्ये पहिल्यांदाच एखादं अमेरिकन विमान कोसळलं. मात्र दोन्ही सैनिकांना सुरक्षितपणे परत आणलं गेलं. ही बचाव मोहीम लष्करी इतिहासातील सर्वात मोठी आणि धोकादायक बचाव मोहिमांपैकी एक आहे. ती कायम स्मरणात राहील, असेही ट्रम्प यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump recounts bravery of US soldier stranded in Iran after crash.

Web Summary : After a US jet crashed in Iran, a wounded soldier evaded capture for 48 hours, alerting US forces. Trump hailed the daring rescue.
टॅग्स :United StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्ध