गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झालेले आखाती देश हे जगभरातील अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेले आहेत. मात्र अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे आखातामधील अनेक देश होरपळून जात आहेत. तसेच इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांसोबत इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याने येथे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या भागात ऐशोआरामी जीवन जगत असलेल्या गर्भश्रीमंतांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पळापळ सुरू केली आहे.
या संदर्भात न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार आखाती देशांमधील गर्भश्रीमंतांची हा भाग सोडण्यासाठी एवढी पळापळ सुरू आहे की, ज्यामुळे ते देश सोडण्यासाठी एका खाजगी विमानासाठी तब्बल ३ लाख ५० हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनामधील तब्बल ३.२ कोटी रुपये एवढी प्रचंड रक्कम मोजण्यासाठीही तयार होत आहेत. आखाती देशांमध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता आपल्याकडील आलिशान गाड्या आणि अमाप संपत्ती सोडून पळण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. सध्या विमाने कमी आहेत आणि पळणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे भाडं वाढत आहे, असे एका खाजगी जेट ब्रोकरेज कंपनीचे सीईओ अमीरह नरन यांनी सांगितले आहे.
आखाती अनेक धनाढ्य लोक युरोपमधील सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी विमान मिळावं यासाठी आपल्या महागड्या वाहनांमधून सौदी अरेबिया गाठत आहेत. मात्र श्रीमंतांची अशा प्रकारे पळापळ होते. तेव्हा खाजगी विमान कंपन्यांचे उखळ पांढरे होते. तसेच अतिश्रीमंत लोक कुठल्याही प्रकारे आपला जीव वाचावा यासाठी आपली अब्जावधीची संपत्ती सोडून युरोपमध्ये जाण्यासाठी पळापळ करत आहेत.
Web Summary : Escalating conflict prompts wealthy Gulf residents to flee, paying exorbitant sums—over $350,000 for private flights—to escape. Abandoning luxury, they seek safety in Europe amidst rising tensions and attacks.
Web Summary : बढ़ते संघर्ष के कारण खाड़ी के अमीर निवासी भाग रहे हैं, निजी उड़ानों के लिए भारी रकम - 350,000 डॉलर से अधिक - चुका रहे हैं। विलासिता को त्यागकर, वे बढ़ते तनाव और हमलों के बीच यूरोप में सुरक्षा चाहते हैं।