शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा दावा पोकळ, होर्मुझमधील सुरक्षेबाबत अमेरिकेने केले हात वर, ऊर्जा मंत्र्यांच्या विधानाने चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:52 IST

Iran War, Strait Of Hormuz:

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरात गंभीर इंधन संकट निर्माण झालं आहे. तसेच अमेरिका आणि इस्राइच्या हल्ल्यानंतर इराणने खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने इंधन वाहतूक करणारी जहाजे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांना संरक्षम देण्याची घोषणा केली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आता पोकळ ठरताना दिसत आहे. तसेच अमेरिकन नौदलाने आपण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्याच्या स्थितीत नसल्याचे स्पष्ट केलं आहे. 

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेने जागतिक अर्थव्यवस्थेमधील इंधन वाहतुकीची लाईफ लाईन असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणचं वर्चस्व मोडीत काढून व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र आता अशा प्रकारची सुरक्षा पुरवणे सध्यातरी शक्य नसल्याची कबुली अमेरिकेने दिली आहे. अमेरिकन नौदलाने दिलेली ही माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानांच्या एकदम विरोधी आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या अमेरिकेच्या टँकर्सना सुरक्षित वाट देण्यासाठी नौदलाकडून एस्कॉर्ट उपलब्ध केला जाईल, असे ट्रम्प यांनी सांगितले होते.  एवढंच नाही तर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून तेल कंपन्यांनी न  घाबरता तेलाचे टँकर्स न्यावेत, असा सल्ला ट्रम्प यांनी बुधवारी दिला होता.

मात्र आता अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राईट यांनी सद्यस्थितीत या भागातून प्रवास करणे सध्यातरी खूप धोकादायक असल्याचे आणि सध्यातरी नौदलाकडून सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याचा सल्ला दिल्यानंतर इराणी सैन्याने या भागातून प्रवास करणाऱ्या जहाजांना एस्कॉर्ट करून दाखवा, असं आव्हान दिलं होतं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Hormuz security claim collapses; US retreats, raising concerns.

Web Summary : Trump's promise of Hormuz Strait security falters as the US Navy admits it can't provide protection amid Iran tensions. Energy Secretary warns of danger, contradicting Trump's earlier advice to tanker companies, escalating regional uncertainty.
टॅग्स :IranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय