अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलं युद्धा दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होत चाललं आहे. यादरम्यान, आज इस्राइलने इराणच्या आणखी दोन बड्या नेत्यांना लक्ष्य करून हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इस्राइलने खामेनेई यांचे निकटवर्तीय असलेले लारिजानी आणि इराणच्या बसीद दलांचे माजी प्रमुख असलेल्या गुलाम रजा सुलेमानी यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात लारिजानी आणि सुलेमानी यांचा मृत्यू झाल्याचे इस्राइलकडून सांगण्यात येत आहे. मात्र लारिजानी हे जिवंत असून लवकरच प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील असा दावा लारिजानी यांच्या कार्यालयाने केल आहे.
इस्राइली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इस्राइलने आज तेहरानमध्ये हल्ला करून खामेनेई यांचे निटवर्तीय असलेल्या लारिजानी यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात लारिजानी यांचा मृत्यू झाला, ते जखमी झाले की सुखरूप बचावले याबाबत माहिती समोर आली नव्हती. मात्र नंतर लारिजानी यांनी आपण सुरक्षित असून, लवकरच प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबरोबरत इस्राइलने इराणच्या बसीज दलांचे माजी प्रमुख गुलाम रजा सुलेमानी यांना लक्ष्य करून एक मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सुलेमानी यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. इस्राइलने मात्र सुलेमानी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या अचूक माहितीचिया आधारावर इस्राइलच्या हवाई दलाने सोमवारी तेहरानच्या मध्यवर्ती भागात एक लक्ष्यभेदी हल्ला केला. या हल्ल्यात गुला रजा सुलेमानी यांना मारण्यात आले, असा दावा इस्राइलने केला आहे.
Web Summary : Israel targeted two Iranian leaders, Larjani and Suleimani, in a fresh attack. While Larjani survived, reports suggest Suleimani was killed. Official confirmation is awaited.
Web Summary : इज़राइल ने ईरान पर फिर हमला किया, जिसमें लारिजानी और सुलेमानी को निशाना बनाया गया। लारिजानी बच गए, लेकिन सुलेमानी की मौत की खबर है। आधिकारिक पुष्टि का इंतजार है।