शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वीकेंडलाच अमेरिका सैन्य कारवाई अथवा मोठा हल्ला का करते?; यामागची 'ट्रम्प'निती समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:59 IST

जर आपण भारताच्या दृष्टीने पाहिले तर देशातील तेलाचा मोठा साठा मध्य पूर्वेतून आयात केला जातो. बहुतांश तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मार्गे येते. जर या भागात तणाव वाढला तर तो मार्ग खंडित होऊ शकतो.

वॉश्गिंटन - अमेरिकाइस्रायलने शनिवारी सकाळी इराणवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला. या संघर्षात नवीन माहिती पुढे येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग २ वेळा असे काम केले आहे, जो केवळ योगायोग नाही तर यामागे ट्रम्प यांची खास रणनीती असल्याचे बोलले जाते. आधी व्हेनेझुएला आणि त्यानंतर इराणवरील सैन्य कारवाई करण्यासाठी ट्रम्प यांनी वीकेंड का निवडले? या दोन्ही देशांवरील हल्ले शनिवार, रविवार या काळात झाले आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारी रात्री अमेरिकेने इराणविरोधात सैन्य कारवाईचे पाऊल उचलले. व्हेनेझुएला असेल अथवा इराण यांच्यावरील हल्ले हे शनिवार किंवा रविवार या २ दिवसांत केले गेले. अखेर यामागे काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. त्यावर तज्ज्ञांनी त्यामागचे कारण सांगितले आहे. ते म्हणतात की, या हल्ल्यामागे जागतिक शेअर बाजार आणि तेल बाजाराचा खेळ आहे. आठवड्याच्या शेवटी बहुतांश शेअर बाजार बंद राहतात. जर हल्ला अथवा सैन्य कारवाई कुठल्याही वर्किंग डे दिवशी झाली तर त्याचा परिणाम बाजारावर होईल आणि सर्व गुंतवणूकदार घाबरलेल्या मनस्थितीत येतील. वीकेंड काळात सैन्य कारवाई करणे हा ट्रम्प यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो ज्यातून बाजारात भीती कमी पसरेल. 

वीकेंडवर हल्ल्याचा प्लॅन

सामान्य दिवशी शेअर आणि तेल किंमतीत चढ उतार पाहायला मिळू शकतात. परंतु जेव्हा हल्ला शनिवारी किंवा रविवारी होत असेल तर सरकार आणि गुंतवणूकदारांना स्थिती समजून घेण्यासाठी वेळ मिळतो. सोमवारी येता येता नुकसानीचा अंदाजही लागतो. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अचानक पसरणारी भीतीही कमी होते. दुसरे मोठे कारण म्हणजे मध्य पूर्वेतील तणाव हा कच्च्या तेलाच्या किंमतीवर वेगाने पडू शकतो. जर हा हल्ला वर्किंग डे दिवशी झाला असता तर बाजार उघडताच किंमती मोठ्या प्रमाणात बदलल्या असत्या. वीकेंडमध्ये कारवाई झाल्याने देशांना मागणी आणि रणनीती चर्चा करण्यासाठी वेळ मिळतो. अनेकदा OPEC सारख्या संघटना बाजार स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक पाऊले उचलू शकतात. 

दरम्यान, सैन्य कारवाई केवळ बाजार लक्षात घेऊन होत नाही त्यामागे सुरक्षा, रणनीती आणि राजनैतिक धोरणेही कारणीभूत असतात. परंतु वेळेची निवड विचारपूर्वक केली जाते जेणेकरून त्याचे जागतिक परिणाम सांभाळता येऊ शकतात असंही  रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात येते. 

भारतावर संकट ओढावणार?

जर आपण भारताच्या दृष्टीने पाहिले तर देशातील तेलाचा मोठा साठा मध्य पूर्वेतून आयात केला जातो. बहुतांश तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मार्गे येते. जर या भागात तणाव वाढला तर तो मार्ग खंडित होऊ शकतो. त्यामुळे भारतात तेल महाग होऊ शकते. तेल महागल्याने भारतात पेट्रोल डिझेटच्या किंमती वाढू शकतात. महागाई वाढण्याचा धोकाही वाढू शकतो. वाहतूक दर महाग झाले तर जीवनावश्यक वस्तूही महाग होऊ शकतात. अधिक दरात तेल खरेदी केल्यास देशाचे आयात बिल वाढू शकते आणि आर्थिक नुकसानही जास्त होऊ शकते. परंतु सध्या कुठलेही मोठे संकट नही. जर हा तणाव कायम राहिला तर किंमतीत परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळेच सैन्य कारवाई भारतासारख्या अनेक तेल आयात करणाऱ्या देशांसाठी चिंतेचे कारण बनू शकते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Why America Launches Military Actions on Weekends: The 'Trump' Strategy

Web Summary : US military actions, like those in Venezuela and Iran, often happen on weekends to minimize global market impact. Weekends give markets time to adjust, preventing panic. Tensions could disrupt India's oil imports, raising prices and inflation.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पStock Marketस्टॉक मार्केट