मध्य आशियातील युद्धाला १६ दिवस पूर्ण होत असताना इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराणच्या शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्ड्सने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना शोधून मारण्याची उघड धमकी दिली आहे. "जर हा बालघाती गुन्हेगार (नेतन्याहू) जिवंत असेल, तर आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्याचा पाठलाग करू आणि त्याला ठार मारू," असे खळबळजनक विधान इराणने केले आहे.
इराणची ही धमकी अशा वेळी आली आहे जेव्हा सोशल मीडियावर नेतन्याहू यांच्या ठावठिकाण्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. १२ मार्च रोजी त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओबद्दलही संशय व्यक्त केला जात आहे. त्या व्हिडिओमध्ये नेतन्याहू यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याने, हा व्हिडिओ एआय द्वारे बनवलेला असावा आणि नेतन्याहू यांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा रंगली आहे.
काय आहे संघर्षाची पार्श्वभूमी?अमेरिका आणि इस्रायलने गेल्या महिन्यात इराणवर संयुक्त हल्ले केले होते, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू केले आहेत. इराणने गेल्या रात्री सलग १२ तास इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल डागली आहेत. या युद्धात आतापर्यंत २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये इराणमधील नागरिकांची संख्या मोठी आहे.
इस्रायलचे स्पष्टीकरणनेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांचे इस्रायल सरकारने खंडन केले आहे. पंतप्रधान पूर्णपणे स्वस्थ आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. मात्र, अद्याप त्यांनी स्वतः समोर येऊन कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
Web Summary : Iran vows to hunt down and kill Netanyahu, calling him a 'child killer'. This follows speculation about his whereabouts and health amid escalating conflict with Israel after attacks and counter attacks. Israel denies rumors of his death.
Web Summary : ईरान ने नेतन्याहू को 'बच्चों का हत्यारा' बताते हुए उन्हें ढूंढकर मारने की धमकी दी है। यह धमकी नेतन्याहू के ठिकाने और स्वास्थ्य के बारे में अटकलों के बीच इजरायल के साथ बढ़ते संघर्ष के बाद आई है। इजरायल ने उनकी मौत की अफवाहों का खंडन किया।