इस्रायलचेइराणवरील हल्ले सुरूच आहेत. इराणची राजधानी तेहरानमधील काही व्हिडीओ समोर आले आहेत. इस्रायलने तेल साठवलेल्या ठिकाणांवरच हल्ले केल्याने मोठे स्फोट झाले आणि आग लागल्याचे व्हिडीओओमध्ये दिसत आहेत. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसने इराणची राजधानी तेहरानमधील अनेक तेल गोदामांवर हल्ला केल्याचे म्हटले आहे.
इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, इराणची राजधानी तेहरानमध्ये असलेल्या काही तेल गोदामांवर आम्ही हल्ले केले आहेत. हा तेल गोदामांवरील एक महत्त्वाचा हल्ला होता. इराणमध्ये तेल गोदामांवर केल्या गेलेल्या हल्ल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहे, ज्यात आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत.
इस्रायलच्या लष्कराचे म्हणणे आहे की, इराणचे सरकार या तेल गोदामांचा वापर सैन्यासाठी करत आहे. यापूर्वी इराणची वृत्तसंस्था फार्स न्यूजने म्हटले होते की, तेहरानमधील एका तेल गोदामावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले असले, तरी त्यात जीवितहानी झाली आहे का? याबद्दल माहिती समोर आलेली नाही.
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका
इराणविरोधात इस्रायल-अमेरिका या दोन्ही देशांनी युद्ध पुकारले आहे. अमेरिकेकडूनही इराणवर हवाई हल्ले सुरूच आहे. इराणकडून अमेरिकेच्या तळांना आणि इस्रायलमधील काही शहरांना लक्ष्य केले गेले. त्यानंतर खवळलेल्या इस्रायलने थेट तेल गोदामांनाच लक्ष्य केले आहे.
५२००० भारतीय मायदेशात परतले
मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या परिस्थितीवर भारत नजर ठेवून आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा यावर बोलताना म्हटले की, काही प्रमाणात हवाई क्षेत्र खुले झाले आहे. त्यामुळे ५२००० पेक्षा अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत.
मध्य पूर्वेतील देशांमध्ये असलेल्या भारतीयांनी स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि त्यानुसार स्वतःला सुरक्षित ठेवावे असे आवाहनही परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
Web Summary : Israel continues attacks on Iran, targeting oil depots in Tehran. Large explosions and fires reported. The strikes follow earlier exchanges, with both sides claiming military necessity. Many Indians safely returned home.
Web Summary : इज़राइल ने ईरान पर हमले जारी रखे, तेहरान में तेल डिपो को निशाना बनाया। बड़े विस्फोट और आग लगने की सूचना है। हमलों के बाद दोनों पक्षों ने सैन्य आवश्यकता का दावा किया। कई भारतीय सुरक्षित रूप से घर लौटे।