शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

इराणला निशस्त्र करण्याचा डाव! पुढील ५ वर्षांत ना मिसाईल, ना युरेनियम...; ट्रम्प आणि इराणमध्ये 'गुप्त' चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:31 IST

Iran US Peace Talks : इराण-अमेरिका युद्ध शांततेच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर ठेवल्या ४ मुख्य अटी. अब्जावधी डॉलर्सची भरपाई आणि नव्या अणू कराराची मागणी. वाचा सविस्तर बातमी.

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी कूटनीतिक बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू केल्या आहेत. 'एक्सिओस'च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचे जावई जारेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ या योजनेचे नेतृत्व करत आहेत. मात्र, दोन्ही देशांनी एकमेकांसमोर ठेवलेल्या कडक अटींमुळे हा मार्ग अजूनही खडतर दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी अत्यंत कडक अटी घातल्या आहेत. ट्रम्प यांच्या या 'पीस प्लॅन'मुळे मध्य पूर्वेतील युद्धाला पूर्णविराम मिळणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

इराणची मागणी: 'नुकसान भरपाई द्या आणि गॅरंटी द्या'इराणने चर्चेची तयारी दर्शवली असली तरी त्यांनी काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. युद्धात झालेल्या आर्थिक आणि जीवितहानीसाठी अमेरिकेने भरपाई द्यावी. भविष्यात इराणवर कोणताही हल्ला होणार नाही, याची लेखी खात्री मिळावी. तातडीने शस्त्रसंधी लागू करण्यात यावी, अशा अटी इराणने ठेवल्या आहेत. 

दुसरीकडे, ट्रम्प प्रशासनाने इराणची नाकेबंदी करण्यासाठी कडक अटी घातल्या आहेत. इराणने पुढील ५ वर्षे आपला कोणताही क्षेपणास्त्र कार्यक्रम राबवू नये. युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवून महत्त्वाचे अणू प्रकल्प बंद करावेत. तसेच हिजबुल्ला, हूती आणि हमास यांसारख्या गटांना मिळणारा पाठिंबा इराणने त्वरित काढून घ्यावा, अशा अटी ठेवल्या आहेत. 

भरपाईऐवजी 'गोठवलेली संपत्ती' परत मिळणार?ट्रम्प यांनी इराणची 'नुकसान भरपाई' देण्याची मागणी थेट नाकारली आहे. मात्र, त्याऐवजी अमेरिकेने गोठवलेली इराणची अब्जावधी डॉलर्सची संपत्ती परत देण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या कतार, इजिप्त आणि ब्रिटन हे देश या चर्चेत मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Iran Plan: No Missiles, No Uranium, Secret Talks?

Web Summary : Trump proposes a peace plan with Iran, demanding nuclear program halt and ceasing support for groups like Hezbollah. Iran seeks compensation and security guarantees. Frozen assets may be returned.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध