शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये 'मोसाद'चा किती आतपर्यंत शिरकाव?; एक तर इराणच्या इंटेलिजेंस विभागाचा हेड बनला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:37 IST

मोसादने इराणमध्ये खूप मजबूत ग्राऊंड नेटवर्क तयार केले आहे. मोसाद गुप्तहेर विरोधी गटांसोबतच सरकारमधील महत्त्वाच्या पदांवरही कार्यरत आहेत.

तेहरान - अमेरिका, इस्रायलच्याइराणवरील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद चर्चेत आली आहे. मोसादची पकड इराणमध्ये खोलवर रुजली आहे असं अनेक रिपोर्टमधून समोर आले आहे. इराणमध्ये मोसाद किती सक्रीय आहे याबाबत एक प्रसंग कायम सांगितला जातो. एकदा इराणने मोसादला रोखण्यासाठी इंटेलिजेंस युनिट बनवली होती. परंतु कालांतराने या युनिटचा हेड मोसादचा गुप्तहेर असल्याचे समोर आले होते. 

इराणमध्ये 'मोसाद' किती मजबूत?

मोसाद काही वर्षापासून नाही तर १९७९ पासून इराणमध्ये सीक्रेट प्रोजेक्टवर काम करत आहे. इराणी क्रांतीनंतर मोसाद सातत्याने तिथे सक्रीय आहे. इराणच्या डिफेन्स सिस्टमवर देखरेख करणे, घुसखोरी आणि त्यांना कमकुवत करण्यासाठी ही यंत्रणा काम करते. इराणच्या प्रमुख डिफेन्स सिस्टमला नष्ट करणे आणि सैन्य कमांडरांना मारणाऱ्या हल्ल्याचे श्रेय इस्रायली गुप्तचर यंत्रणेला जाते. इराणच्या सुरक्षेत मोसादने खूप आतपर्यंत शिरकाव केला आहे.

मोसादने इराणमध्ये खूप मजबूत ग्राऊंड नेटवर्क तयार केले आहे. मोसाद गुप्तहेर विरोधी गटांसोबतच सरकारमधील महत्त्वाच्या पदांवरही कार्यरत आहेत. इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने इराणमध्ये शेकडो गुप्तहेर तैनात केलेत. मोसादने शस्त्रे आणि ड्रोनचा साठा इराणमध्ये तस्करी करून गुप्त ठिकाणी ठेवला आहे. जो प्रत्येकवेळी हल्ल्यात वापरला जातो. इराणमध्ये अनेकदा कारवाईत लोकांना अटक केली. त्यांच्यावर इस्रायली गुप्तहेर असण्याचा आरोप आहे. कायम इराणी सरकारचे अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षा टीमला इस्रायली हॅकिंगपासून वाचण्यासाठी स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली आहे. त्याशिवाय मागील काही काळापासून कंपन्यांतील कर्मचारी आणि घर एखाद्याला भाड्याने दिले असेल तर त्याची माहिती सांगणे बंधनकारक केले आहे. इराण वेळोवेळी काही लोकांना संशयास्पद हालचालीवरून अटक करते.

दरम्यान, मागील २ दशकांत इस्रायलने इराणमधील अनेक अणु वैज्ञानिकांची हत्या केली आहे. ज्यात मोहसेन फखरीजाहेद यांचाही समावेश आहे. इस्रायलने २०१० साली स्टक्सनेट कॅम्प्युटर वायरसही इराणमध्ये पसरवल्याचे बोलले जाते. यामुळे इराणमधील किमान १४ अणुऊर्जा प्रकल्पांमधील ३०,००० संगणकांमध्ये बिघाड झाला होता. जानेवारी २०१८ साली एका रात्री मोसादचे गुप्तहेर तेहरानच्या बाह्य परिसरातील एका गुप्त गोदामात घुसले होते. तिथे मोठ्या प्रमाणात ३२ इराणी तिजोरी होती. त्यात इराणने अणुऊर्जेबाबत कागदपत्रे लपवली होती. पहाटे ५ वाजता सर्व गुप्तहेर या गोदामातून बाहेर पडले होते. मोसाद गुप्तहेरांनी जे दस्तावेज जाळले त्यात ११४ फोल्डरचा समावेश होता. त्यात ५५ हजाराहून अधिक पानांमध्ये ८५०० लिखित दस्तावेज होते.

माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा

एकदा इराणचे माजी राष्ट्रपती अहमदीनेजाद यांनीही खळबळजनक दावा केला होता. इस्लामिक रिपब्लिक इराणने मोसादच्या कारवाया रोखण्यासाठी एक सीक्रेट विभाग तयार केला होता. त्याचा हेडच मोसादचा गुप्तहेर निघाला. इतकेच नाही तर इराणमधील त्या सीक्रेट विभागात कमीत कमी २० मोसादचे गुप्तहेर होते. त्यामुळे मोसादच्या ताकदीचा अंदाज त्यांनी शत्रू देशातील गुप्तचर यंत्रणेला हायजॅक केल्यावरून दिसून येते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mossad's Deep Infiltration in Iran: How Far Does It Reach?

Web Summary : Reportedly, Mossad has deeply infiltrated Iran since 1979, compromising defense and intelligence. It allegedly sabotaged nuclear programs, assassinated scientists, and even infiltrated Iran's intelligence unit, highlighting Mossad's extensive reach and operational capabilities within the country.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेई