पश्चिम आशियातील संघर्ष थांबवण्यासाठी, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की या देशांनी मध्यस्थी करत अमेरिका आणि इराणला ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव धुडकावून लावत इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
या प्रस्तावासंदर्भात बोलताना पश्चिम आशियातील दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्की येथील मध्यस्थांनी तयार केला आहे. हे देश संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, या ४५ दिवसांच्या कालावधीत दोन्ही देशांना कायमस्वरूपी युद्धविरामासंदर्भात सर्वसमावेशक चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळेल.
संंबंधित अधिकाऱ्यानी म्हटले आहे की, हा प्रस्ताव रविवारी रात्री उशिरा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि मध्यपूर्वेतील अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना पाठवण्यात आला. मात्र यावर अमेरिकेची प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने होर्मुझ खुली करण्यास आणि ४५ दिवसांच्या अस्थायी युद्धविरामाला नकार दिला आहे.
असा आहेत युद्धविरामाच्या अटी -- पहिल्या टप्प्यात ४५ दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव आहे, या कालावोधीत कायमस्वरूपी शांतता करारावर वाटाघाटी. वाटाघाटींसाठी अधिक वेळ लागल्यास हा युद्धविराम वाढवला जाऊ शकतो, असे म्हणण्यात आले होते.
- दुसऱ्या टप्प्यात युद्ध संपवण्यासाठी अंतिम करार केला जाईल. सूत्रांच्या मते, अंतिम करार झाल्यानंतरच होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणे आणि इराणकडील उच्च-समृद्ध युरेनियमवर तोडगा काढणे, जसे की ते देशाबाहेर पाठवणे किंवा त्याचे प्रमाण कमी करणे.
- या प्रस्तावाच्या अटींसंदर्भात सर्वप्रथम 'ॲक्सिऑस' या वृत्त संकेतस्थळाने माहिती दिली होती. इराणचे म्हणणे आहे की, जोपर्यंत आर्थिक नुकसान भरपाई आणि भविष्यात कोणतेही हल्ले होणार नाहीत, याचे आश्वासन मिळत नाही, तोवर लढत राहणार.