अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षात युद्धविराम घडवण्यामध्ये पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानचं वजन अचानक वाढल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र अमेरिका आणि इराणदरम्यान झालेल्या युद्धविरामावरून आता एक मोठा वाद उभा राहिला आहे. या शस्त्रसंधीमध्ये लेबेनॉनचाही समावेश असल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेला दावा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणमध्ये झालेला युद्धविरामाची मोठ्या उत्साहात घोषणा केली होती. पाकिस्तानने केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे. तसेच हा युद्धविराम सर्व ठिकाणी लागू असेल, तसेच त्यामध्ये लेबेनॉनचाही समावेश असेल. एवढंच नाही तर १० एप्रिलला इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेत याबाबतच्या सर्व पैलूंवर अंतिम मोहोर उमटेल, असे शरीफ यांनी सांगितले होते. शरीफ यांनी युद्धविरामाबाबत केलेल्या दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण युद्धविरामाबाबत इस्राइल आणि अमेरिकेचे दावे वेगवेगळे होते.
दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी युद्धविरामाबाबतचा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा दावा फेटाळून लावला आहे. हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मला वाटतं की, हा दावा दिशाभूल करणारा आहे. इराणला वाटतंय की युद्धविरामामध्ये लेबेनॉनचाही समावेश आहे. मात्र असं नाही आहे. आम्ही कधीही असं आश्वासन दिलेलं नाही, असे जेडी वेन्स यांनी स्पष्टपणे सांगितले.
Web Summary : Shahbaz Sharif claimed Pakistan brokered a ceasefire including Lebanon. US VP JD Vance refuted this, stating no such assurance was given regarding Lebanon's inclusion in the ceasefire agreement, creating international confusion.
Web Summary : शाहबाज शरीफ ने दावा किया कि पाकिस्तान ने लेबनान सहित युद्धविराम कराया। अमेरिकी उपराष्ट्रपति जेडी वेंस ने इसका खंडन करते हुए कहा कि लेबनान को युद्धविराम समझौते में शामिल करने का कोई आश्वासन नहीं दिया गया, जिससे भ्रम पैदा हो गया।