शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

युद्धादरम्यान इराणला मोठा धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात आणखी एका मोठ्या नेत्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:12 IST

Iran War: अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या आणखी एका बड्या नेत्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. इराणचे उप गुप्तचर मंत्री अकबर गफ्फारी यांचा अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

इराणविरोधातअमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला आता १२ दिवस लोटले आहेत. या संघर्षात इराण अमेरिका आणि इस्राइलच्या बलाढ्य शक्तीला जोरदार आव्हान देत असले तरी इराणचीही या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे. या युद्धाच्या सुरुवातीलाच अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता इराणच्या आणखी एका बड्या नेत्याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. इराणचे उप गुप्तचर मंत्री अकबर गफ्फारी यांचा अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

अकबर गफ्फारी यांच्या मृत्यूची माहिती इराणी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. इराणी वृत्तसंस्था आयएलएनएने सांगितले की, इराणचे उप गुप्तचर मंत्री अकबर गफ्फारी हे तेहरानवर अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात मारले गेले आहेत. अकबर गफ्फारी यांनी आधी ईस्ट अझरबैजान प्रांताचे पॉलिटिकल सिक्युरिटी डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहिले होते.  अकबर गफ्फारी यांच्यावर तबरीज शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

दरम्यान, मागच्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये अमेरिकन सैन्याने इराणची लष्करी शक्ती जवळपास संपुष्टात आणली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन सैन्याने केलेली कारवाई एवढी वेगवान आणि अचूक होती की, ज्यामुळे इराणची महत्त्वपूर्ण संरक्षण क्षमता काही तासांतच उद्ध्वस्त झाली, असा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. इराण एक प्रबळ देश आहे. मात्र त्यांच्या मुख्य लष्करी ताकदीचं आम्ही जबर नुकसान केलं आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Suffers Major Blow: Top Leader Killed in US-Israel Strike

Web Summary : Amid ongoing conflict, Iran's deputy intelligence minister, Akbar Ghaffari, was killed in a US-Israel strike in Tehran. This follows earlier reports of Ayatollah Khamenei's death. US President Trump claims Iranian military power is diminished.
टॅग्स :IranइराणWarयुद्धIsraelइस्रायलUnited Statesअमेरिका