शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इराणला मिळाली रशियाची साथ, पुतिन यांनी स्पष्ट केली भूमिका; इस्रायल-अमेरिका तणावात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:11 IST

Iran Russia Relations: अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर रशियाने इराणला पाठिंबा दिला आहे.

Iran Russia Relations: इस्रायविरोधातील युद्धात अमेरिकेने अचानक हल्ला केल्यामुळे इराण बॅकफूटवर आला आहे. इस्रायलला अमेरिकेकडून थेट मदत मिळतेय, पण इराणला अद्याप रशिया आणि चीनकडून म्हणावी तशी मदत मिळालेली नाही. इराणचे प्रमुख खामेनी यांनी रशियाकडे मदतीचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना रशियाच्या दौऱ्यावर पाठवले असून, आता रशियाने इराणला मदत करण्यास तयारी दर्शवली आहे.

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रशियन सरकारचे प्रवक्ते पेस्कोव्ह म्हणाले, रशियाने यापूर्वीही इराण-इस्रायल युद्धावर आपली भूमिका उघडपणे जाहीर केली आहे. आम्ही इराणला मदत करायला तयार आहोत, आता फक्त इराणला काय हवे आहे, यावर सर्व काही अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रशियन सैन्यानेही या युद्धात उडी घेतली, तर हे युद्ध आणखी भयानक रुप धारण करू शकते.

पुतिन काय म्हणाले?मॉस्कोमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना सांगितले की, इराणवरील आक्रमण चुकीचे आणि निराधार आहे. त्यांनी पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला. दरम्यान, रशियाने या युद्धात उडी घेतली, तर इराणची शक्ती वाढेल. रशियन हवाई संरक्षण मिळाल्यानंतर, इराणमध्ये इस्रायली हल्ल्यांमुळे होणारे नुकसान कमी होईल. मात्र, या युद्धाची भीषणता आणखी वाढू शकते.

 

 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलrussiaरशियाAmericaअमेरिका